श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे यवत नगरीत डि जे लावून स्वागत. हभप कुदळे महाराज यांच्या कीर्तनात रंगले वारकरी.
By : Polticalface Team ,06-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. २७ जून २०२४. श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान बुधवार दि ०३ जुलै २०२४ रोजी सासवड येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरातून सकाळी ११ वाजता प्रस्थान पंढरीनाथाच्या भेटीसाठी पंढरपूर कडे वाटचाल
करीत असताना. मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी दि ०५/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०७ वाजता पालखी सोहळ्याचे आगमन झाले. यवत येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने डि जे. लाऊन स्वागत करण्यात आले.
तसेच श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्या बरोबर एकुण ३२ दिंड्यां आहेत. यवत गावातील एक दिंडी या सोहळ्यात सहभागी झाल्यास आनंदच होईल अशी अपेक्षा पालखी सोहळ्यातील मान्यवरांनी यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात बोलताना व्यक्त केली. या प्रसंगी यवत गावातील ह.भ. प. सोनबा किसन कुदळे महाराज. विश्व वारकरी संघ महाराष्ट्र राज्य दौंड तालुका अध्यक्ष यांचे किर्तन रुपी नामस्मरण करण्याची सेवा केली या प्रसंगी कुदळे महाराज यांनी उत्कृष्ट मायबोली भाषेतून पंढरीच्या पांडुरंगाचे वर्णन केले. ! देह हा काळाचा धन हे कुबेराचे येथे मानवाचे काय आहे..!
! संतजन रुपास मिळाले म्हणून लागला चटका. आत्मा साधुनी परमोक्ष मिळाला गुरुने पाजीला गुटखा.!
अशा प्रकारे वारकरी संप्रदायातील संतांचिया उपदेशाचे नामस्मरण करून काव्यातून स्पष्टीकरण केल्याने समस्त ग्रामस्थ वारकऱ्यांनी समाधानात्मक आनंद व्यक्त केला. श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रथ ओढण्यासाठी गेली आठ वर्षां पासून. सलग सासवड ते पंढरपूर अशी वारी करण्याची संधी पालखी विश्वस्तांनी यवत येथील शेतकरी हभप बबन तात्या दोरगे. यांच्या खिंल्लारी राजा सोन्या बैलजोडीला मान आहे. तसेच
नगारखाना व चौघडा.या बैलगाडीला यवत येथील शेतकरी कुटुंबातील छबनराव कुदळे यांच्या सर्जा राजा बैलजोडीला तीन वर्षांपासून मान आहे. या प्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे. दिलीप दोरगे कैलास आबा दोरगे नानासो दोरगे महाराज. शंकरराव दोरगे. खंडु दादा दोरगे. किसन दोरगे शामराव दोरगे. यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे. दत्तात्रय दोरगे पाटील. चंद्रकांत दादा दोरगे. विनायक दोरगे. महेश गायकवाड. तसेच यवत पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आदी मान्यवर भाविक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :