नो रिझर्वेशन, नो इलेक्शन या घोषणेने राष्ट्रीय महामार्ग दणाणला! पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता बीड जिल्ह्यामध्ये अखेर राष्ट्रीय महामार्ग आडवला
By : Polticalface Team ,Wed Dec 22 2021 21:11:43 GMT+0530 (India Standard Time)
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणूका घेण्यात येऊ नयेत ह्या मागणीसाठी आज अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने व समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी साहेब, बीड यांच्या मार्फत मा.पंतप्रधान,भारत सरकार व मा.मुख्यमंत्री मोहदय,महाराष्ट्र राज्य यांना निवेदन ही देण्यात आले. या आंदोलनासाठी मोठ्याप्रमाणात समता सैनिक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :