यवत भुलेश्वर फाटा येथील सेवा मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम संपन्न. फाट बॉईज चा उपक्रम. तीव्र आंदोलनाचा इशारा,

By : Polticalface Team ,10-07-2024

यवत भुलेश्वर फाटा येथील सेवा मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम संपन्न. फाट बॉईज चा उपक्रम. तीव्र आंदोलनाचा इशारा, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १० जुलै २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील भुलेश्वर फाटा येथील सेवा मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम दि १० जुलै रोजी सकाळी ११ वा जे सुमारास संपन्न झाला. या बाबत अधिक माहिती अशी की यवत येथील पुणे सोलापूर हायवे लगत असलेल्या सेवा मार्गात अनेक दिवसांपासून मोठ मोठे खड्डे पडले आहेत, गेले दोन दिवसांपासून या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामध्ये सेवा मार्गावरील खंड्डे पाण्याने भरले असल्याने. सेवा मार्गावर धावणाऱ्या मोटर सायकल चालकांच्या नजरेत मोठे खड्डे येत नाहीत, त्यामुळे या खंड्या मध्ये मोटर सायकल आदळून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत, या वेळी चालकास किरकोळ दुखापती झाल्या आहेत, मात्र पाटस टोल प्लाझा. वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी या बाबत काना डोळा करून दुर्लक्ष करीत आहेत, सेवा मार्गावरील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, काही दिवसापूर्वी यवत येथील सेवा मार्गावरील खड्ड्यांमुळे भिषण अपघात होऊन, अनेक जीवाशी गेले आहेत, या बाबत पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेऊन भुलेश्वर फाटा बॉईज स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन, सेवा मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला आहे, मौजे यवत येथे नॅशनल हायवे प्रशासनाने यापूर्वीच चुकीच्या पद्धतीने ड्रेनेज लाईन करून, नागरिकांची गैरसोय केली आहे, या बाबत ना हक त्रास सहन करावा लागत आहे, यवत येथील सेवा मार्गा पेक्षा अधिक उंच ड्रेनेज लाईन केल्यामुळे, पावसाचे पाणी ड्रेनेज लाईन मध्ये न जाता ते सेवा मार्गावरून वाहत आहे, ड्रेनेज लाईन नेमकी कशासाठी हा प्रश्न अजून सुटत नाही, या बाबत यवत येथील नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तक्रारी करुन देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे भुलेश्वर फाटा बॉईज स्थानिक युवकांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले भुलेश्वर फाटा सेवा मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम केल्यामुळे मोटर सायकल चालकांच्या नजरेत येत आहे, त्यामुळे होणारा अपघात व दुर्घटना रोखण्यासाठी वृक्षरोपण करणे हा राम बाण उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी माहिती भुलेश्वर फाटा बॉईज युवकांनी दिली, पाटस टोल प्लाझा महामार्ग दुरुस्ती विभागाने तत्काळ दखल घेऊन यवत येथील दोन्ही बाजूच्या ड्रेनेज लाईन ची दुरुस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोरील भुयारी मार्गातील पाण्याचा ढव, तसेच दोन्ही बाजूकडील सेवा मार्गाचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचे काम तातडीने करावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने पाटस टोल प्लाझा वरिष्ठ अधिकारी यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भुलेश्वर फाटा बॉईज स्थानिक युवकांनी बोलताना दिला आहे, यवत येथील सेवा मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने भुलेश्वर फाटा बॉईज युवक तरुण मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती, आबासाहेब दोरगे, निलेश लाटकर, मयुर दोरगे, लाला दोरगे, स्वप्निल यादव, गौरव शिपलकर, रुद्र सरदे, अभि दोरगे, शुभम शेळके, तुषार लाटकर, विशाल दोरगे, तसेच यवत व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.