वरवंड येथे २१ जुलै रोजी दौंड नोकरी महोत्सव युवा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन. मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होणार. - नामदेव बांपु ताकवणे.

By : Polticalface Team ,15-07-2024

वरवंड येथे २१ जुलै रोजी दौंड नोकरी महोत्सव युवा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन. मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होणार. - नामदेव बांपु ताकवणे.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.

दौंड ता १५ जुलै २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा नामदेव बांपु ताकवणे यांनी दि १४ जुलै रोजी दु २:३० वाजता पुणे सोलापूर हायवे चौफुला ता दौंड जिल्हा पुणे येथील ( एस फोर जी मिटिंग हॉल ) या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले. दौंड नोकरी महोत्सव युवा रोजगार कार्यक्रमाचे उद्घाटन मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होणार असून मौजे वरवंड येथील सिध्दीराज मंगल कार्यालय या ठिकाणी दि २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ०९ पासून दिवसभर दौंड नोकरी महोत्सव युवा रोजगार मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नामदेव राजाराम ताकवणे यांनी केले आहे.


या दौंड नोकरी महोत्सव मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दौंड तालुका ग्रामीण भागातील युवा तरूणांना आवाहन केले आहे.मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत दौंड नोकरी महोत्सव हा युवा रोजगार मेळावा होणार असून दौंड तालुक्यातील कुरकुंभ ( एम आय डी सी) भांडगाव सहजपुर नांदुर  बारामती, सह हेंकेल, सीप्ला, रिटगन, बजाज, भारत फोर्ज, टाटा सह सहजपुर नांदुर अन्य विविध ४७ कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.  दौंड तालुका ग्रामीण भागातील होतकरू आय टी आय तसेच डिप्लोमा कोर्स परिपुर्ण असलेल्या व दहवी बारावी उत्तीर्ण झालेल्या युवा तरुण बेरोजगारांना पुढील काळात नोकरी ची हमी देणारा महोत्सव ठरणार असल्याने युवा तरुणांनी आपल्या स्वतःकडील असतील ते कागदपत्रासह मेळाव्यात उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात आले असुन दौंड तालुक्यातील बेरोजगार युवा तरुणांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने या दौंड नोकरी महोत्सव युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


 दौंड तालुक्यातील कुरकुंभ ( एम आय डी सी) भांडगाव  सहजपुर नांदुर बारामती, सह हेंकेल, सीप्ला, रिटगन, बजाज, भारत फोर्ज, टाटा सह सहजपुर नांदुर अन्य विविध ४७ कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून नामांकित कंपनीमध्ये तालुक्यातील 

भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच इतर राज्यांतील अनेक मजुर विविध कंपन्यांमध्ये ठेकेदार यांच्या वतीने. काम करीत आहेत.

कामगारांच्या एकुण संख्येतील वीस ते पंचवीस टक्के कामगार हे भूमिपुत्र असणे आवश्यक आहे. मात्र तसे दिसून येत नाही. तालुक्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुणाला अचानक ब्रेक देऊन घरी पाठवले जाते‌. या बाबत अनेक तरुणांनी व पालकांनी खंत व्यक्त केली आहे.

कायम स्वरुपी कंपनीत नोकरी करण्याची हमी नसल्याने तरुणांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे, या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने संबंधित कंपनीतील प्रमुख वरिष्ठ पदाधिकारी जनरल मॅनेजर. पदाधिकारी यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा करण्या बाबत मा शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी संवाद झाला आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील युवा तरूणांनी मोठ्या संख्येने या दौंड नोकरी महोत्सव युवा रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा नामदेव बांपु ताकवणे यांनी केले आहे.


दौंड तालुक्यातील विविध कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या युवा तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून भूमिपुत्रांना कायम स्वरूपी नोकरी ची हमी नाही. ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया ताकवणे यांनी व्यक्त केली.

मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना या दौंड नोकरी महोत्सव युवा रोजगार मेळावा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमंत्रित करण्यात आले आहे दौंड तालुक्यातील कुरकुंभ भांडगाव सहजपुर नांदुर बारामती या भागातील विविध उद्योगिक कंपन्यांनी भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. या शिवाय कायम स्वरूपी नोकरी ची हमी मिळाली पाहिजे. तालुक्यातील अनेक कंपन्यांनी इतर राज्यांतील ठेकेदार पोसले आहेत. हे इतर राज्यांतील मंजुर कामगारांची  पिळवणूक करीत असुन. स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जात असल्याचे तरुणांनी व पालकांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या असल्याचे नामदेव बांपु ताकवणे यांनी बोलताना सांगितले,


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.