न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगावच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे धडे देत लोकशाही पद्धत अवलंबिली

By : Polticalface Team ,16-07-2024

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगावच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे धडे देत लोकशाही पद्धत अवलंबिली

      लिंपणगाव (प्रतिनिधी)--श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे धडे गिरवून प्रत्यक्ष मतदान करून  विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी लोकशाही पद्धतीने निवडले.

या प्रतिकात्मक निवडणुकीत अर्ज भरणे अर्ज माघार घेणे अर्जाची छाननी मतदान करणे निकालाबरोबर आचारसंहितेचा कालावधी निवडणुकीचा प्रचार यासारख्या बाबी लहान लहान मुलांनी हुबेहूब नक्कल करून आदर्श लोकशाहीचा समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. विद्यार्थी उमेदवारांना वटवृक्ष, पुस्तक, पेन ,स्कूल बॅग ,शाळा इमारत ,अशी चिन्हे शाळेतील शिक्षकांच्या निवडणूक आयोगाने दिले. तेव्हा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांचा चिन्हा द्वारे प्रचार केला शालेय वर्ग मंत्री मंडळ निवडणुकीचे संपूर्ण नियोजन विभाग प्रमुख श्री. प्रणव नलगे सर यांनी केले.निवडणूक आयोग अधिकारी म्हणून मुख्याध्यापक श्री. हौसराव दांगडे साहेब व पर्यवेक्षक श्री.विलास भाऊ सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी म्हणून श्री.शेळके आर. टी.,श्री. काळुखे वैभव  व सौ.मीनाक्षी कदम , श्रीम.लक्ष्मी बोलणे यांनी काम पाहिले तर आर्मी ड्रेस परिधान करून विद्यार्थ्यांना रांगेत मतदानाकरिता मतदान केंद्रात पाठविण्याचे काम  शंकर यदलोड सर यांनी केले.

 केंद्र अध्यक्ष वर्ग शिक्षक आणि मतदान अधिकारी म्हणून वर्गातीलच मुलांनी मतदानाची कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली यानंतर दोन दिवसानंतर निकालाची मोजणी करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना मध्ये खेतमाळीस चैतन्य सदानंद व विद्यार्थिनीं उमेदवार मध्ये कु.पानसरे गौरी हिची निवड झाली. यावेळी विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. रामदास पवार ,अरुण पवार,संतोष भोईटे ,अंकुश कोकाटे,  भगवान दिघे ,अर्चना कोरडे, सुमती सुरसे , महादेवी माने ,बाबासाहेब शिरोळे यांनी परिश्रम घेतले.यावेळी नागवडे कारखाना संचालक श्री.सुभाष काका शिंदे ,रवींद्र महाडिक ,विजय उंडे,उपसरपंच राहुल साळवे,बापूसाहेब वाबळे,सचिन उंडे ,अमोल गाढवे उपस्थित होते

प्रकाश म्हस्के
संपादक

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

संतती; संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-- ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज

भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा परांडा भाजपाच्या वतीने सत्कार

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान !

श्रीगोंदा तालुक्यात माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

बोरा फुड्स प्रा.लिमिटेड. रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे. यांच्या संयुक्त प्रयत्नातून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपयाचे आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण.

स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

संस्कार शाळेत दिले गुड टच आणि बॅड टच चे प्रशिक्षण

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला.

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

पोरांनो, तुम्ही खरे कर्मवीरांचे व महादजी शिंदेंचे वारसदार आहात!- कर्जतचे आजोबा मुलांच्या कृतीने गहिवरले...

केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे

लोणी काळभोर येथे होणार आयुर्वेदिक औषधे उपचार महाशिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर.

उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली राजाभाऊ कदम यांनी केली मागणी

करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येकाने जीवन निष्कलंक जगावे; भक्तीने परमेश्वर प्रसन्न होतो- हभप श्रीनिवास महाराज बुगे श्री व्यंकनाथ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साह सांगता