करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

By : Polticalface Team ,03-09-2024

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

करमाळा प्रतिनिधी सर्पदंशावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले करमाळा येथील डॉ. प्रदीपकुमार बुवासाहेब जाधव पाटील (वय ६५) यांचे आज (मंगळवार) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नगर येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर बुधवारी (ता. ४) सकाळी १० वाजता तरटगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. जाधव पाटील हे २५ वर्ष आदिनाथ कारखान्याचे संचालक होते. त्यात त्यांनी दोनवेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. गावातील विविध सेवा कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालकापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. संचालक झाल्यानंतर ते सोसायटीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ते आदिनाथ कारखान्याचे संचालक झाले होते. मोहिते पाटील यांच्यामाध्यमातून त्यांनी राजकीय काम सुरु केले होते. त्यांचे करमाळा तालुक्यातील बागल, जगताप, पाटील व शिंदे गटाच्या प्रमुखांशी अतिशय चांगले संबंध होते. त्यांनी राजकरणविरहित सामाजिक काम देखील मोठे केले होते. डॉ. जाधव पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर सायकलवर जाऊन ग्रामीण भागात सेवा दिली. त्यात सर्पदंशावर उपचार करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. त्यांचे वडील कै. बुवासाहेब जाधव पाटील हे महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक होते. डॉ. जाधव पाटील यांच्या पाश्चात आई, पत्नी, भाऊ संतोष पाटील (आदिनाथचे माजी अध्यक्ष), मुलगा डॉ. रोहन पाटील व उपसरपंच अभिजित पाटील पुतण्या अजिंक्य जाधव पाटील, सून डॉ. शिवानी जाधव पाटील, भावजई असा परिवार आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते