By : Polticalface Team ,15-09-2024
जनआधार न्युज भिमसेन जाधव मो 9112131616 बारामतीची जागा कोण लढवणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या आठ दिवसांत यावर निर्णय होईल, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत व्यक्त केले आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लढत झाली. या निवडणुकीत सुप्रिया सुळे जवळपास दीड लाखांच्या लीडने निवडून आल्या.२०१९ च्या निवडणुकीपर्यंत लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार असा बारामतीचा पॅटर्न ठरला होता. पण अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला शरद पवार कोणाला उमेदवारी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना, मलाही यासंदर्भात काहीही माहिती नाही. बारामती विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळणार? गेल्या काही दिवसांपासून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. युगेंद्र पवार हेदेखील बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते शरद पवार यांच्यासोबत सातत्याने दिसत आहेत. त्यांनी बारामतीत, स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पण शरद पवार ऐनवेळी कुणाला उमेदवारी देणार, बारामतीच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे