By : Polticalface Team ,14-09-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :
शनिवार 14 सप्टेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री लेंडे सर प्रमुख वक्त्या श्रीमती कोरडे मॅडम व विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यानी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या श्रीमती अर्चना कोरडे यांनी हिंदी भाषेचे महत्व व हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा कसा दिला याविषयी सविस्तर माहिती सांगितली व सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कशाला विठ्ठल लेंडे यांनी हिंदी साहित्याचा इतिहास आणि संत कबीरांचे दोहे यांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे , पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे, विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी जंजाळ व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तेजस्विनी डोंगरे या विद्यार्थिनीने केले. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
वाचक क्रमांक :