By : Polticalface Team ,15-09-2024
जनआधार न्युज
भिमसेन जाधव
मो 9112131616 बारामती .याबाबत भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.त्याची दखल घेऊन बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी निधी उपलब्ध केल्यानंतर रस्ता करून देऊ असे लेखी आश्वासन दिले.आणि तात्काळ रस्त्यावर मुरूम टाकून दिला त्यामुळे नागरिकांना वाहने चालवताना होणार त्रास कमी झाला. संघटनेच्या मागणीची दखल घेऊन सदर विषयाला बारामती येथील पत्रकार बांधवांनी प्रसिद्धी दिली होती. त्यांचे देखील संघटनेच्या वतीने आभार.
भारतीय युवा पँथर संघटनेचे गौरव अहिवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार शुभम गायकवाड संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य,अस्लम शेख पुणे जिल्हाध्यक्ष, निखिलभाई खरात बारामती शहराध्यक्ष, समीर खान संघटक बारामती शहर, यांनी सदर विषयाचा पाठपुरावा केला.
सदर रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लढत राहणार असे भारतीय युवा पँथर संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष असलम वस्ताद यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बारामती नगर परिषद चे मुख्याधिकारी महेश रोकडे व बांधकाम विभाग प्रमुख सोनवणे यांनी सहकार्य केले त्याबद्दल आभार
वाचक क्रमांक :