बोरा फुड्स प्रा.लिमिटेड. रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे. यांच्या संयुक्त प्रयत्नातून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपयाचे आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण.

By : Polticalface Team ,05-09-2024

बोरा फुड्स प्रा.लिमिटेड. रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे. यांच्या संयुक्त प्रयत्नातून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपयाचे आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये येथील बोरा फुड्स प्रा.लिमिटेड या कंपनीच्या सी एस आर फंडातून आणि रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून साडेचार लाख रुपये खर्चून आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण सोयीसुविधासह बांधून देण्यात आले आहे. त्या शौचालयाचे शाळेला अर्पण मंगळवारी करण्यात आले. शाळेतील यापूर्वीच्या शौचालयाची जीर्णावस्थामुळे पडझड आणि दुरावस्था झाली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची खूपच गैरसोय होत होती. हे पाहून बोरा फुड्स कंपनीच्या टाॅयलेट ब्लॉक प्रकल्प अंतर्गत आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयात पाणी व अन्य सुविधा पुरविण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याप्रसंगी शाळा समितीच्या अध्यक्षा अंकिता गुळूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष आखाडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गणेश कदम, बोरा फुड्स कंपनीचे सरव्यवस्थापक पंकजशेठ शिंगवी, व्यवस्थापक महावीर ललवाणी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा शमिका पवार, पदाधिकारी डॉ. आनंद केंच, रोशन चुंबळकर, सतीश भोपटकर, निर्मला डोंगरे, राजेंद्र भवळकर, परिणीता कुलकर्णी, संतोष घोणे व रोमेशकुमार गुप्ता, शिक्षक लीना डोईफोडे व राणी सुतार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. आनंद केंच यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विविध आजारांपासून दूर राहाण्यासाठी करावयाचे उपाययोजना व स्वच्छतेबाबत काटेकोर पालन करण्याची सूचना केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात सोनचाफा, जांभूळ, गुलमोहर व अन्य वृक्षांची रोपांची रोपण करण्यात आले. शाळेच्यावतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रभारी मुख्यापिका अनिता क्षीरसागर यांनी केले , तर शिक्षक दादा दरेकर यांनी आभार मानले.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते