बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला.

By : Polticalface Team ,04-09-2024

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०४ सप्टेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे. येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांची चकरा मारून दमछाक झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत सर्वसामान्य रोजंदारी मोल मजुरी करणाऱ्या महिलांचे बँक खात्यात भरणा करणे किंवा पैसे काढणे. असे व्यवहार न झालेले. तत्पूर्वीचे खाते बंद असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच चालू केलेली लाडकी बहीण योजना अंतर्गत अनेक महिलांनी अर्ज भरले असून. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अनेक महिलांना लाडके बहिण योजनेचे तीन हजार रुपये पोस्ट खाते. पीडीसी बँक. बडोदा बँक. या खातेदारांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे. मात्र बँक ऑफ महाराष्ट्र यवत शाखा येथील महिला खातेदार यांना. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. महिला खातेदारांना रोज यवत शाखेत येलझरे घालून वैतागून गेली आहेत. आधार लिंक नाही. पॅन कार्ड जोडले नाही. खाते बंद झाले आहे. केवायसी फॉर्म भरलेला नाही. केवायसी फॉर्म भरावा लागेल. दोन हजार रुपये दंड पडला आहे. दंड भरल्या शिवाय खातं चालू होणार नाही. बंद पडलेल्या तुमच्या खात्यात पैसे भरल्या शिवाय खाते चालू होणार नाही. आधार कार्डवर जन्मतारीख नाही. नावात बदल झाला आहे. पॅन कार्ड वर जन्म तारीख चुकली आहे. मोबाईल नंबर बदली झाला आहे.अनेक दिवसा पासून तुमचे बँकेचे व्यवहार बंद आहेत. अशा अनेक कारणांचे उत्तरे देऊन. बँक कर्मचारी ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांना उलट सुलट हिंदीतून उत्तरे देत आहेत. ग्रामीण भागातील मोल मजुरी करणाऱ्या महिलांना हिंदी भाषा उमजून येत नसल्याने. काय करावे ते कळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंग्लिश भाषेत केवायसी फॉर्म असल्याने. लिहिता वाचता येईना. आठवी नववी शिक्षित असलेल्या नागरिकांना देखील बँकेतील फॉर्म भरणे बाबत मदत घ्यावी लागते. तर मग अशिक्षित ग्रामीण भागातील बोल मजूर रोजंदारी करणाऱ्या महिलांचा काय ? बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कोणत्याही अशिक्षित खातेदार महिलांना केवायसी फॉर्म भरणे बाबत मदत केली जात आहे. शिवाय कोणतीच माहिती दिली जात नाही. ग्रामीण भागातील शेतकरी मोल मजुरी रोजंदारी काम करणाऱ्या महिलांना या बाबत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आजूबाजूच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र काही महिलांचे बँकेच्या हलगर्जीपणामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या बाबत अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत विभाग यांच्याशी संपर्क साधून लाडकी बहिण योजने अंतर्गत भरलेल्या फॉर्म बाबत चौकशी केली असता. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत वगळता सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये अनुदान जमा झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. एवढ्या त्रुटी असताना देखील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत व्यवस्थापकांनी या महिलांची खाते उघडली च कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीलाच खाते काढण्याच्या तत्पूर्वीच या बाबत नियमावलीचे पालन केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. अनेक महिलांचे खाते बंद झाली असून. खातेदारांना विनाकारण दंड भरावा लागत आहे. या बाबत. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत व्यवस्थापक यांची भेट घेऊन चौकशी केली असता. हा वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयाचा निर्णय आहे आम्ही त्याला काय करू शकतो. असे त्यांनी बोलताना सांगितले. राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली. लाडकी बहीण योजना हि राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. या बँकेतील बंद असलेल्या खातेदारांची दंड वसुलीसाठी झाली की काय असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कोणत्याही खातेदार महिलांना केवायसी फॉर्म भरणे बाबत माहिती दिली जात नाही. किंवा फॉर्म भरण्यास मदत केली जात नाही. हि मोठी शोकांतिका पाहायला मिळाली. बँक खातेदारांनवर कर्मचाऱ्यांचा शिरजोरा कशासाठी. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थीं महिलांची येलझरे अध्यापही सुरू आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांची धावपळ करून पिळवणूक केली जात आहे. दोन दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतच मुरत आहेत. योजनेचे पैसे महिलांपर्यंत पोहोचावेत. या बाबत माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी सर्व शासकीय व बँक व्यवस्थापकांना जिल्हास्तरावरून सूचना दिल्या असताना देखील बँक खातं बंद असल्याचे कारण दाखवून दोन हजार रुपये पेक्षा अधिक दंड आकारला जात आहे. या बाबत राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत येथील शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांची चौकशी करावी. अशी मागणी यवत पंचक्रोशीतील महिला नागरिकांकडून केली जात आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते