पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

By : Polticalface Team ,03-09-2024

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

लिंपणगाव ( प्रतिनिधी) मढेवडगाव येथील प्रतिक पेट्रोल पंपाच्या संचालिका श्रीमती नयनतारा शिंदे यांनी पती कै. पोपटराव शिंदे यांच्या स्मरणार्थ दावल मलिक माळावर ५५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. याबाबत बोलताना नयनतारा शिंदे म्हणाल्या की, आज निसर्ग संवर्धन व संगोपन करणे ही नितांत गरजेची बाब झालेली आहे. पतीच्या अकालीन् निधनानंतर आई वडील भाऊ तसेच सासरच्या शिंदे परिवाराच्या भक्कम पाठिंबामुळे मी उभी राहू शकले व आज स्वतःचा उद्योग व्यवसाय यशस्वीरित्या करीत आहे. पतीच्या स्मरणार्थ सतत काहीतरी करण्याची भावना मनामध्ये आहे. म्हणून यापूर्वीही वृक्षारोपण व इतर उपक्रम राबविलेले आहेत. सध्या पर्यावरणातील प्रदूषण कमी करणे व निसर्ग संवर्धना करिता काही तरी करणे आवश्यक असल्याची भावना मनामध्ये निर्माण झाल्यामुळे मढेवडगाव येथील दावल मलिक माळावर करंजी 25, चिंच 15 , गुलमोहर चाफा अशी एकूण 55 वृक्षांचे रोपण करण्यात आले. सदर प्रसंगी वृक्षारोपणाकरिता खड्डे खोदण्यासाठी सुरेश पवार यांनी फक्त इंधन टाकून जे.सी.बी. मशीन उपलब्ध करून दिले. यावेळी श्रीमती नयनतारा शिंदे यांच्या समवेत श्रीमती राणीताई शिंदे, मेजर नवनाथ शिंदे, हरून इनामदार, निखिल राहिंज, प्रशांत शिंदे, प्रवीण शिंदे, पंकज उंडे, प्रसाद उंडे, धनराज जाधव, दादा ढवळे, विशाल मोहरकर, विनोद सोनवणे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते