खोमणे मळा जिल्हा परिषद शाळेत
बाल दिंडीचे आयोजन
श्रीगोंदा( प्रतिनिधी)
शालेय जीवनात बालकांवर विविध संस्कार व्हावेत. नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी शाळेत शिक्षक विविध उपक्रम राबविले जातात याचाच भाग म्हणून घारगाव येथील खोमणेमळा जि प शाळेत बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. सर्व विद्यार्थ्यांचे सुंदर गणवेशांमध्ये शाळेत आगमन झाले. तसेच पालखीची सजावट पताका तयार करणे, हार तयार , इतर वस्तूंची सजावट करणे अशा प्रकारे छोट्या-मोठ्या अनेक गोष्टींची तयारी करून दिंडीचे नियोजन झाले दिंडी संजय साळुंखे यांच्या घरापर्यंत नेण्यात आली .त्यादरम्यान रस्त्याच्या शेजारील घरातील महिलांनी दिंडीचे पूजन केले तसेच संतोष खोमणे यांनी सर्व दिंडीला भोजनाची व्यवस्था करून दिली .सर्व मुलांनी ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम या भक्ती गाण्यावर ठेका धरला. दिंडी पुन्हा शाळेत आल्यानंतर शाळेमध्ये रिंगण सोहळा, फुगडी इत्यादी प्रात्यक्षिके करण्यात आली .अतिशय उत्साही वातावरणामध्ये दिंडी सोहळा खोमणेमळा शाळेमध्ये पार पडला. त्यामध्ये शाळेच्या सहशिक्षिका अनिता कांबळे व सर्व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व ग्रामस्थांनी दिंडीच्या यशस्वी नियोजनाबद्दल व शाळेचे मुख्याध्यापक बापूराव खामकर तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
वाचक क्रमांक :