भिम छावा संघटनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना निवेदन. मागासवर्गीय नागरिकांचा निधी इतरत्र वळविण्याचा निर्णय रद्द करा.

By : Polticalface Team ,19-07-2024

भिम छावा संघटनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना निवेदन. मागासवर्गीय नागरिकांचा निधी इतरत्र वळविण्याचा निर्णय रद्द करा.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. पुणे ता. १८ जुलै २०२४ महाराष्ट्र राज्य शासनाने मागासवर्गीय नागरिकांच्या विकासात्मक कामाचा निधी हा मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळाला न वळवणे बाबत तसेच दिनांक १४ जुलै २०२४ रोजी घेतलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करणे बाबत. भिम छावा संघटना संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण विभाग पुणे आयुक्त यांना दि, १८ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक १४ जुलै २०२४ रोजी राज्य सरकारने अद्यादेश काढून समाज कल्याण विभागाचा जो निधी आहे तो दलितांच्या विकासाठी, शिक्षणासाठी व इतर विकासात्मक कामासाठी वापरला जातो. गेली अनेक वर्षे बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नाही. दलित वस्त्या दलित विद्यार्थी विकासा पासून वंचित आहेत. असे असताना शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचा निधी हा मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळाला वळवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. हा आदेश मागसवर्गीय समाजावर अन्याय करणारा आहे. या निर्णया बद्दल मागासवर्गीय नागरिकांनमध्ये संतापाची लाट उसळलेली असुन नाराजी व्यक्त केली जात आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी हा अनुसूचित जातीसाठी असताना तो इतरत्र का वळविला गेला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना राबविण्यासाठी सरकारकडे पर्यटन खाते, पर्यटन महामंडळ व पर्यटन महासंचालनालय आहे. त्या मार्फत मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना राबविणे गरजेचे आहे. असे असताना अनुसूचित जातीचा निधी चुकीच्या पध्दतीने वळविणे म्हणजे दलिलांवर अन्याय केल्या सारखे होत आहे. रमाई घरकुल योजनेसाठी निधी नाही. अन्याय अत्याचार ग्रस्तांना भरपाई दिली जात नाही. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान दिले जात नाही. दलित वस्ती सुधारणा योजनेला निधी दिला जात नाही. परंतु दलितांच्या विकासात्मक कामाचा निधी इतरत्र वळविला जात आहे. हि मोठी शोकांतिका असुन मागासवर्गीय समाजातील नागरिकांना अडथळा निर्माण करणारा निर्णय आहे.तो त्वरीत रद्द करण्यात यावा अन्यथा भिम छावा संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक २३/०७/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता समाज कल्याण विभाग पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिम छावा संघटना संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मागासवर्गीय दलितांचा आणखीन सर्वांगीक विकास झालेला नसताना त्यांचा हक्काचा निधी वळवण्याचा घाट निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेला आहे. हा निर्णय त्वरित रद्द करा व कर्नाटकच्या व आंध्रप्रदेश तेलंगाना च्या धर्तीवर राज्य सरकारने कायदा करावा जो दलितांचा निधी आहे तो वळवता येत नाही. व बुडवताही येत नाही असा कायदा पारित करावा अशी मागणी होत आहे. भिम छावा संघटनेच्या वतीने अध्यक्ष शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून येत्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी भिम छावा संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड, निलम गायकवाड, अनिकेत पालखे, सुमित गायकवाड, गोविंद पाटणेकर, प्रशांत कांबळे, विजय परमार, संघभूषण साखरे आदी भिम छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

संतती; संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-- ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज

भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा परांडा भाजपाच्या वतीने सत्कार

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान !

श्रीगोंदा तालुक्यात माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

बोरा फुड्स प्रा.लिमिटेड. रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे. यांच्या संयुक्त प्रयत्नातून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपयाचे आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण.

स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

संस्कार शाळेत दिले गुड टच आणि बॅड टच चे प्रशिक्षण

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला.

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

पोरांनो, तुम्ही खरे कर्मवीरांचे व महादजी शिंदेंचे वारसदार आहात!- कर्जतचे आजोबा मुलांच्या कृतीने गहिवरले...

केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे

लोणी काळभोर येथे होणार आयुर्वेदिक औषधे उपचार महाशिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर.

उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली राजाभाऊ कदम यांनी केली मागणी

करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येकाने जीवन निष्कलंक जगावे; भक्तीने परमेश्वर प्रसन्न होतो- हभप श्रीनिवास महाराज बुगे श्री व्यंकनाथ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साह सांगता