उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागवडे कारखान्यावर 22 जुलैरोजी मेळावा.

By : Polticalface Team ,20-07-2024

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागवडे कारखान्यावर 22 जुलैरोजी मेळावा.

लिंपणगाव ( प्रतिनिधी)--

        महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिला भगिनींकरिता जाहीर केली असून सदर योजना प्रभावीपणे राबविण्यामध्ये श्रीगोंदा तालुका व विशेषतः नागवडे यांच्या  टीमने चांगले काम झाले असून शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे करिता प्रयत्न केले आहेत. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. 22 रोजी दुपारी १ वाजता सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे  व जिल्हाध्यक्षा सौ. अनुराधा नागवडे यांनी दिली. 

              प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते असल्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक समाज उपयोगी योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना  लोकप्रिय ठरली असून तिची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारे झाली असल्यामुळे अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.  २२ जुलै रोजी १ एक वाजता नागवडे कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे, राज्याच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,  राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आमदार संग्राम जगताप, राज्य मार्केट कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

          नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी असून या योजनेसंदर्भात ना. अजितदादा पवार हे महिलांशी संवाद साधणार असल्यामुळे काही महिलांना अजित दादांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला भगिनींची उपस्थिती महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्याच दिवशी अजितदादांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे अभिष्टचिंतन व सत्कारही करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र दादा नागवडे व सौ. अनुराधा नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

संतती; संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-- ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज

भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा परांडा भाजपाच्या वतीने सत्कार

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान !

श्रीगोंदा तालुक्यात माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

बोरा फुड्स प्रा.लिमिटेड. रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे. यांच्या संयुक्त प्रयत्नातून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपयाचे आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण.

स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

संस्कार शाळेत दिले गुड टच आणि बॅड टच चे प्रशिक्षण

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला.

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

पोरांनो, तुम्ही खरे कर्मवीरांचे व महादजी शिंदेंचे वारसदार आहात!- कर्जतचे आजोबा मुलांच्या कृतीने गहिवरले...

केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे

लोणी काळभोर येथे होणार आयुर्वेदिक औषधे उपचार महाशिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर.

उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली राजाभाऊ कदम यांनी केली मागणी

करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येकाने जीवन निष्कलंक जगावे; भक्तीने परमेश्वर प्रसन्न होतो- हभप श्रीनिवास महाराज बुगे श्री व्यंकनाथ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साह सांगता