पाचपुते - मगर गटासह नागवडे यांचा घोंगडी बैठका , चौक सभा , गावागावात दिवस रात्र सभासदांच्या भेटी सह तालुक्यातील झंझावाती दौरा
By : Polticalface Team ,Sat Dec 25 2021 10:05:19 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदे : -
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून छाननी प्रक्रिये नंतर माघार घेण्याच्या आगोदर ऐन थंडीत पाचपुते मगर गटाने व राजेंद्र नागवडे यांच्या गटाने तालुक्यात झंझावाती दौरा सुरू केला असून घोंगडी बैठका, कॉर्नर सभेसह सभासदांच्या वैयक्तिक भेटी गाठी घेत आहेत. तर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह गावोगावी घोंगडी बैठका, छोटेखानी कॉर्नर सभा घेत आहेत मात्र सभासद हे त्यांना भर कार्यक्रमात कारखान्याच्या कारभाराबाबत विचारणा करत असल्याचे चर्चा होत आहे त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापवले आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणुक 14 जानेवारी रोजी 21 जागांसाठी होत आहे. होणारी निवडणूक ही स्व. शिवाजीराव (बापू) नागवडे यांच्या निधननंतर होणारी पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत त्यांचे खंदे समर्थक निष्ठावंत असलेले कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन केशवभाऊ मगर यांनी कारखान्याच्या चुकीच्या कारभाराला वैतागून बंड पुकारून विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या विरुध्द दंड थोपटत होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात आमदार बबनराव पाचपुते यांच्या सोबत हातमिळवणी करून शेतकऱ्यांची कामधेनू असलेला कारखाना वाचविण्यासाठी सहकार विकास पैनल उभा केला. त्याच माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात पाचपुते - मगर गटाने झंझावाती दौरा सुरू केला असून या दौऱ्यात त्यांनी घोंगडी बैठका, कॉर्नर सभे घेण्यावर भर देत सभासदांच्या वैयक्तिक भेटी गाठी वर भर देत आहेत . तर याला प्रतिउत्तर देण्यासाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी देखील किसान क्रांती पैनल उभारून आपल्या कार्यकर्त्यांसह गावोगावी घोंगडी बैठका, छोटेखानी कॉर्नर सभा घेत आहेत मात्र या सभांमध्ये गावागावात राजेंद्र नागवडे यांना काही गावात चांगले वातावरण आहे तर काही गावात रोषाला सामोरे जावे लागत आहे कारण नागवडे यांच्या प्रचार सभेत सामान्य सभासद शेतकरी कारखान्याच्या चुकीच्या कारभाराबाबत विचारणा करत असल्याने या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागत आहे . कार्यकर्त्यांमध्ये तसेच सभासदांमध्ये चर्चा होत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याच प्रश्नांच्या भाडीमाराने सहकार विकास पैनल विरुद्ध किसान क्रांती पैनल यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असल्याने ऐन थंडीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
चौकट : -
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कारभाराला वैतागून पाचपुते मगर गटाने सहकार विकास पैनल उभा करत गावोगावी सभासदांच्या बैठका घेत असताना सभासद देखील त्यांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे चर्चा सुरू आहे , तर नागवडे यांनी किसान क्रांती पैनल उभा करून गावोगावी सभासदांच्या बैठका घेत असताना सभासद त्यांना कारखान्याच्या कारभार बाबत जाब विचारत असल्याची देखील चर्चा आहे.
वाचक क्रमांक :