अल्लाह च्या रूपाने माजी आमदार राजाभाऊ जगताप यांच्या मुलाने माझ्या मुलाचे प्राण वाचविले अकलूज येथील अल्ताफ सय्यद यांचे भावनिक बोल,शंभूराजे जगताप यांच्या मदती मुळे वाचले अकलूज येथील एका तरुणाचे प्राण
By : Polticalface Team ,21-07-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
अल्लाह च्या रूपाने येऊन माजी आमदार राजाभाऊ जगताप यांच्या मुलाने माझ्या मुलाचे प्राण वाचविले असे हृदय पिळवटून टाकणारे भावनिक बोल अकलूज येथील अल्ताफ सय्यद यांनी काढले त्याचे झाले असे शंभूराजे जगताप यांच्या मदती मूळे ३२ वर्षीय युवकाचे प्राण वाचले... . . . आपल्या कुटुंबियासोबत दि . २० जुलै रोजी अकलुज भागात जात असताना सायंकाळी ६ .३० वाजता प्रवासा दरम्यान अकलूज शहराजवळ अचानक रस्त्यावर वाहनांचे ट्राफिक व लोकांची गर्दी दिसली . क्षणाचाही विलंब न लावता शंभूराजे गाडीतून खाली उतरले व रस्त्यावरील गर्दीकडे गेले . पाहतो तर काय ! समोर एक यूवक गाडीला कुत्रे आडवे गेल्याने घसरून पडून गंभीर जखमी होवून पडलेला डोक्याला जबर मार बसलेला अन् रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेला . बघ्यांनी खूप गर्दी केलेली पण मदती साठी कोणी पुढे आले नव्हते . तेवढ्यात शंभूराजे तेथे पोहोचले अन् कोणताही विचार न करता त्यांनी त्या रक्ताने माखलेल्या युवकाला कवेत घेऊन आपल्या गाडीत टाकले अन् थेट अकलुज मधील राणे हॉस्पीटल मध्ये नेवून अडमिट केले . २४ तास कोमात गेलेला हा यूवक ज्याचं नाव आहे अब्दुल अल्ताफ सय्यद . आता तो कोमातून बाहेर आला असून त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे . तो अत्यंत गरीब कुटुंबातील असून रिक्षा चालकाचा मुलगा आहे . खरंतर सय्यद कुटुंबांवर वेळ आली होती पण शंभूराजे यांच्या धाडसी कृत्यामुळे व मदतीमुळे ती वेळ टळली आहे . अल्लाह च्या रूपाने येऊन करमाळ्याचे माजी आमदार राजाभाऊ च्या मुलाने आमच्या अब्दुल चा जीव वाचवला असे अब्दुल चे वडील अल्ताफभई कृतार्थ होवून बोलत होते .
वाचक क्रमांक :