By : Polticalface Team ,24-10-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सौ.अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू स्व.सदाशिव पाचपुते यांनी यावेळी आम्हाला पाठिंबा द्या भविष्यात पुढच्या वेळी तुम्हाला पाठिंबा देऊ असे आवाहन केल्याने सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आणि सौ अनुराधा नागवडे यांनी आमदार बबनराव पाचपुते यांना पाठिंबा दिला. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण असताना भाजप उमेदवार बबनराव पाचपुते विजयी झाले दुर्दैवाने ३ वर्षापूर्वी कोरोना काळात सदाशिव पाचपुते यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी पित्याने दिलेला शब्द सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत देखील पाळला आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेनेला मिळाली.; असता स्वतः ऐवजी सौ.अनुराधा नागवडे यांच्या नावाची शिफारस करून पाठिंबा देऊन शब्द पाळला आता १० वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत स्व. कुंडलिक तात्या जगताप यांनी यंदा राहुल जगताप यांना पाठिंबा द्या; भविष्यात आम्ही (जगताप गट) तुम्हाला पाठिंबा देऊ; असे आश्वासन दिले. त्यावेळी ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संस्थापक माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी जगताप यांचा प्रस्ताव स्वीकारला स्व. शिवाजीराव नागवडे यांनी उमेदवारी करणार नाही. असे जाहीर केले. त्याचवेळी राज्यात आघाडी आणि युती ने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला काँग्रेसने स्व. शिवाजीराव नागवडे यांना एबी फॉर्म पाठवत असल्याचे सांगितले. त्यावर स्व. नागवडे यांनी मी खासदार शरद पवार यांना राहुल जगताप यांच्या विजयासाठी शब्द दिला असल्याचे सांगत नम्रपणे चालून आलेली उमेदवारी नाकारली. .आता या परत फेडीची वेळ महाविकास आघाडीची उमेदवारी सौ. अनुराधा नागवडे यांना मिळाल्याने माजी आमदार राहुल दादा जगताप यांनी मनाचा मोठेपण दाखवत १० वर्षापूर्वी नागवडे गटाने प्रत्येक गावात आणि जेथे जगताप गटाला कार्यकर्ते संख्या कमी असताना मेहनत घेऊन विजयी केले. त्यासाठी सौ. अनुराधा नागवडे यांना पाठिंबा द्यावा; अशी मागणी १० वर्षापूर्वी जगताप यांच्या साठी मेहनत घेणारे नागवडे गटाचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
नागवडे गटाने सहकारात बिनविरोध निवडणुकीत विरोधकांना मदत केली. विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांना मदत केली. आता नागवडे २००९ नंतर १५ वर्षांनी निवडणुकीत उतरले. त्यांना मदत करून परतफेड करावी अशी मागणी नागवडे गटाचे कार्यकर्ते करत आहेत.
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड नगरपरिषद मतमोजणी दि.२१ रोजी स्ट्राँगरुम शासकीय धान्य गोदाम (मदर तेरेसा चौक) येथे सकाळी १० वाजता होणार
केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?
केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.