लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात.२४ तासात आरोपी जेरबंद.
By : Polticalface Team ,22-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २२ जुलै २०२४ दौड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १७/७/२०२४ रोजी रात्री ८.३० वाचे सुमारास दौड गावचे हद्दीत नगरमोरी चौकामध्ये महीला नामे ऋतुजा निलंकठ पुकले रा, संभाजीनगर, जि. संभाजीनगर हया एस.टी. बसची वाट पहात असताना एक पांढ-या रंगाची ४ चाकी वाहन घेवुन एक अनोळखी इसम सदर महीले जवळ येवुन कोठे जायचे आहे, अशी विचारना करून मी नगरला चाललो आहे मी तुम्हाला सोडतो असे म्हणुन कार मध्ये बसवुन मौजे दौड गावचे हद्दीत असलेले सोनवडी नदीच्या पुला जवळ कार थांबवुन सदर महीलेस दमदाटी करून महीलेच्या गळयातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावुन तसेच तिचेकडे असलेली बँग घेवुन तिला सदर ठिकाणी सोडुन निघुन गेल्या बाबत नमूद करण्यात आले असून दौड पोलीस स्टेशन येथे गु रं न ५२८/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पो नि संतोष डोके यांनी डि. बी पथकास गुन्हयाचे अनुशंगाने सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने एक टिम तयार करून गुन्हा घडला त्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही फुटेजच्या व गोपनिय बातमीदाराचे आधारे अज्ञात वाहनाचा व आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा प्रफुल्ल उर्फ बिंदु प्रकाश पानसरे वय.२८ रा. पाटस ता. दौड जि.पुणे. याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा मौजे वंरवड येथील चौकात येणार असल्याची खबर दौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण डि बी पथकाला समजल्याने. डि.बी पथकाने सापळा रचुन गुन्हयात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे आरोपीकडुन गुन्हयात चोरलेली सोन्याची चैन व गुन्हयात वापरलेली कार असे एकुण ५ लाख ५० हजार हजाराचा मुद्देमाल दौंड पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीस अटक करून त्याचे कडे गुन्हयाचे अनुशंगाने प्राथमिक तपास केला आरोपी कडुन पुणे जिल्हा हद्दीत अशा प्रकारे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. अशी माहिती दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख सो. अप्पर पोलीस अधिधक संजय जाधव सो उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप सो यांचे मागर्दर्शनाखाली पोनि संतोष डोके, सो मपोसई सुप्रिया दुरदे पोहवा. सुभाष राउत, नितीन बोराडे, पांडुरंग बोरात, शरद वारे, पोना. अमीर शेख पोशि. अमोल देवकाते, रविद्र काळे योगेश गोलांडे यानी केली आहे सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास मपोसई सुप्रिया दुरंदे या करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
पहा स्वामी समर्थ प्रकटदिन विशेष माहिती
स्वराज्यनिष्ठ राजेशिर्के घराण्याची बदनामी करणाऱ्यांना सदबुद्धी देण्यासाठी वंशजांचे शिरकाई देवीस साकडे
शिव पानंदचे आंदोलन महसुलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित- शरद पवळे/ दादासाहेब जंगले(शिव पानंद शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य)
शेतात कांद्याची वखार तयार करायची नाही. भावाचाच भावाला विरोध. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मलठण येथील घटना.
पेडगाव वि.का.सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी शहाजी पाटील खेडकर, व व्हा चेअरमन पदी निलेश झिटे यांची बिनविरोध निवड
इम्पा संघटनेच्या वतीने काष्टी येथे फुले - आंबेडकर जयंती संपन्न. जीवनगौरव पुरस्काराचे वितरण. डॉ. लोणकर, जयराम सोनोने व उत्तम वडवकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
बारामती सहकारी बॅंक काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत चेअरमन सचिन सातव यांचे प्रतिपादन.
सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सतरा वर्षानंतर गळाभेट!
तब्बल पंचवीस वर्षानंतर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नजीक रस्त्याने घेतला मोकळा श्वास
पत्रकार कुरुमकर व प्राचार्य खेडकर यांचा पत्रकार संघाकडून सन्मान
पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक क्षेत्राला अधिक बळ दिले -मुख्याध्यापक हौसराव दांगडे
दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खासदार सुप्रिया सुळे. रमेश आप्पा थोरात. आप्पासाहेब पवार. यांनी केले वंदन.
दीर्घायुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने चांगले विचार व गुरुने दिलेल्या संस्काराची सांगड घालावी मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीच्या निमीत्ताने. पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंदी.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक शिंदे याचा नवोदय परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक काय
पत्रकार कुरुमकर यांचा कानिफनाथ व लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून सन्मान
लिंपणगाव मध्ये हनुमान जयंती सोहळा उत्साही वातावरणात साजरा
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व भिम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
श्रीगोंदा शुगर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने. दौंड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग संपन्न. (बेकायदा अवैध धंदे बंद करा)