श्री तिलोक जैन विद्यालयाच्या २१०० विद्यार्थ्यांनी लिहीले पंतप्रधानांना पोस्टकार्ड
By : Polticalface Team ,Sat Dec 25 2021 10:07:15 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय हे एक नामांकीत विद्यालय असून प्राचार्य अशोक दौंड यांच्या मार्गदर्शनातून सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात . त्या अनुषंगाने हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव सतिश गुगळे व प्राचार्य अशोक दौंड यांच्या मार्गदर्शनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व विद्यार्थ्यांकडून २०४७ मधील माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर पत्र लिहीण्याची संकल्पना पुढे आली.
या उपक्रमास सर्वच विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला व तब्बल २१०० पोस्टकार्ड लिहिली. विद्यार्थ्यांनी शताब्दी नंतर भारताची प्रगती कशी व्हावी, हे सुचवतांना भ्रष्टाचारमुक्त भारत , समृद्ध लष्कर , जगात महासत्ता बनण्याची वाटचाल , रस्ता व दळणवळण सुविधा , नदीजोड प्रकल्प , औद्योगिकरण , दर्जेदार शिक्षण इ. विविध विषयावर आपले मत मांडले.
या विशेष समारंभाचे आयोजन करून संस्थेचे सचिव सतिश गुगळे व प्राचार्य अशोक दौंड यांच्या हस्ते पोस्ट मास्तर अनिता फुलकर , पोस्टमन पप्पू दिवटे यांच्याकडे ही सर्व पोस्टकार्डे सुपुर्द करण्यात आली.
या उपक्रमाचे संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी , सचिव सतिश गुगळे , खजिनदार सुरेश कुचेरिया , विश्वस्त धरमचंद गुगळे , .डॉ. ललीत गुगळे , राजेंद्र मुथ्था यांनी विशेष कौतुक केले.
तसेच शिक्षण क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे. या उपक्रमात पर्यवेक्षक विजयकूमार छाजेड, सुधाकर सातपूते, सुनिल मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी केले तर आभार प्राचार्य अशोक दौंड यांनी मानले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद