एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पै. धनश्री फंडची भारतासाठी सुवर्ण कामगिरी
By : Polticalface Team ,24-07-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी) दि. 16 ते 22 जुलै 2024 दरम्यान थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये 55 किलो वजन गटात महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची पै. धनश्री फंड हिने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. पहिली कुस्ती कझाकिस्तानच्या शुकुमारोवा सोबत 2-12 च्या गुणांनी धनश्रीने विजय मिळवला. त्यानंतर सेमिफायनलला चीनच्या चेन ली सोबत 10-13 च्या फरकाने धनश्रीने विजय मिळवत फायनलला धडक मारली व फायनलला जपानच्या युनो सोबत 4-6 च्या फरकाने धनश्रीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक खेचून आणले. श्रीगोंदा इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे प्रमुख हनुमंत फंड यांची कन्या धनश्री फंड हिने नियमित सराव व कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कला शाखेत पदवीचे शिक्षण ती घेत आहे. पै. धनश्री फंड हिची ही सुवर्ण कामगिरी महिला कुस्ती खेळाडूंसाठी प्रेरणादायी व उत्साह वाढवणारी आहे. तिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले, ही श्रीगोंदा तालुक्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. पै. धनश्री फंडच्या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शा. शि .संचालिका कल्पना बागुल , हनुमंत फंड, सौ. पूजा फंड व प्रतीक सातव यांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न
गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध
पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान
दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान
श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!
संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.
इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय
कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन
फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.
निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा
10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण
नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.