एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पै. धनश्री फंडची भारतासाठी सुवर्ण कामगिरी

By : Polticalface Team ,24-07-2024

एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पै. धनश्री फंडची भारतासाठी सुवर्ण कामगिरी  श्रीगोंदा (प्रतिनिधी) दि. 16 ते 22 जुलै 2024 दरम्यान थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये 55 किलो वजन गटात महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची पै. धनश्री फंड हिने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. पहिली कुस्ती कझाकिस्तानच्या शुकुमारोवा सोबत 2-12 च्या गुणांनी धनश्रीने विजय मिळवला. त्यानंतर सेमिफायनलला चीनच्या चेन ली सोबत 10-13 च्या फरकाने धनश्रीने विजय मिळवत फायनलला धडक मारली व फायनलला जपानच्या युनो सोबत 4-6 च्या फरकाने धनश्रीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक खेचून आणले. श्रीगोंदा इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे प्रमुख हनुमंत फंड यांची कन्या धनश्री फंड हिने नियमित सराव व कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कला शाखेत पदवीचे शिक्षण ती घेत आहे. पै. धनश्री फंड हिची ही सुवर्ण कामगिरी महिला कुस्ती खेळाडूंसाठी प्रेरणादायी व उत्साह वाढवणारी आहे. तिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले, ही श्रीगोंदा तालुक्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. पै. धनश्री फंडच्या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शा. शि .संचालिका कल्पना बागुल , हनुमंत फंड, सौ. पूजा फंड व प्रतीक सातव यांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.