केडगाव चौफुला येथील जबरी चोरीचा गुन्हा १२ तासांचे आत उघडकीस. ४५ लाख रूपये हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा यवत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण ची कामगिरी.
By : Polticalface Team ,24-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ जुलै २०२४. दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील केडगाव चौफुला रघुनंदन हॉटेल येथील घटना. जेवणासाठी थांबलेल्या चारचाकी वाहनातून ५० लाख रुपयांची बॅग काढून पळविली या बाबत. यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७४९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे आरोपी बंडू उर्फ गजानन सुरेश काळवाघे. रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता.जि. बुलढाणा याचे विरुद्ध दि.२४/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने बाबत अधिक माहिती अशी की दि.२३/०७/२०२४ रोजी फिर्यादी शरद मधुकर डांगे वय ७६ वर्षे रा. चैतन्य वाडी ता.जि.बुलढाणा हे त्यांची सुन व व्याही यांचे सोबत रघुनंदन हॉटेल, चौफुला केडगाव येथे रात्री ०९ वाजे सुमारास जेवणासाठी थांबले होते. त्या वेळी त्यांचे सोबत असलेल्या बंडू ऊर्फ गजानन काळवाघे याने फिर्यादीस चाकू दाखवून जमीनीचे व्यवहारातून विसार म्हणून मिळालेली पन्नास लाख रूपये असलेली पैशाची बॅग. त्यांचे चारचाकी वाहनातून जबरदस्तीने काढून घेवून पळून गेला. असे नमूद करण्यात आले असून. शरद मधुकर डांगे यांच्या फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे व यवत पोलीस स्टेशनचे पथकाने घटनास्थळी भेट दिली. यातील फिर्यादीकडे विचारपूस केली असता, फिर्यादी शरद डांगे यांची सुनबाई हिचे वडीलांची कर्नाटक इंडी या गावात जमीन होती. सदर जमीनीचा व्यवहार बंडु ऊर्फ गजानन काळवाघे यांनी विरभद्र कट्टी रा. इंडी कर्नाटक यांचे सोबत जमवून दिला. एकूण १८ एकर क्षेत्राचे व्यवहारात ५० लाख रूपये अडव्हान्स घेण्यात आला होता. फिर्यादी शरद डांगे, त्यांची सुनबाई, व्याही, बंडु काळवाघे असे त्यांचे कडील चारचाकी वाहनातून इंडी येथून पुण्याकडे येत असताना केडगाव चौफुला येथे जेवण करणेसाठी थांबले तेव्हा सदरचा प्रकार घडला आहे. अशी माहिती दिल्याने तपास पथकांनी बंडू काळवाघे याचा व त्याचे सोबतचे इतर दोन अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तांत्रिक विश्लेषणाद्वारे बंडू काळवाघे हा केडगाव न्हावरा रोडने शिरूर बाजूकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा पाठलाग सुरू करणेत आला, स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर विभागातील पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे मदतीने न्हावरा फाटा या ठिकाणी सापळा लावणेत आला. आरोपी नामे बंडू ऊर्फ गजानन सुरेश काळवाघे, वय ४० वर्षे रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता.जि. बुलढाणा यास न्हावरा फाटा येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचेकडून गुन्हयात चोरी केलेली ४५ लाख रूपये रक्कम हस्तगत करणेत आलेली आहे.
आरोपी बंडू ऊर्फ गजानन काळवाघे वय वर्षे रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता.जि. बुलढाणा यास अटक करणेत आले असून त्याची पोलीस कोठडी रिमांड मिळणे कामी मा.न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. आण्णासाहेब घोलप, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, स्था.गु.शा.चे सपोनि राहूल गावडे, पोसई अमित सिद-पाटील, पोसई प्रदीप चौधरी, यवत पो स्टेचे सपोनि प्रविण संपांगे, शिरुर पो.स्टे चे पोसई अभिजीत पवार, स्था.गु.शा.चे अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजू जाधव, असिफ शेख, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, धीरज जाधव यवत पो स्टे चे अंमलदार भानुदास बंडगर, रामदास जगताप, महेंद्र चांदणे, राजीव शिंदे, दत्ता काळे, प्रमोद गायकवाड, विकास कापरे, गणेश मुटेकर, शिरूर पो स्टेचे अंमलदार नारायण जाधव, विकी यादव, तसेच नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथील मपोसई भाग्यश्री जाधव, महिला अंमलदार बी एन दळवी, पोहवा चंद्रकांत भोसुरे यांनी केली असून पुढील तपास यवत पो स्टेचे हे सपोनि प्रवीण संपांगे करत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
पहा स्वामी समर्थ प्रकटदिन विशेष माहिती
स्वराज्यनिष्ठ राजेशिर्के घराण्याची बदनामी करणाऱ्यांना सदबुद्धी देण्यासाठी वंशजांचे शिरकाई देवीस साकडे
शिव पानंदचे आंदोलन महसुलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित- शरद पवळे/ दादासाहेब जंगले(शिव पानंद शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य)
शेतात कांद्याची वखार तयार करायची नाही. भावाचाच भावाला विरोध. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मलठण येथील घटना.
पेडगाव वि.का.सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी शहाजी पाटील खेडकर, व व्हा चेअरमन पदी निलेश झिटे यांची बिनविरोध निवड
इम्पा संघटनेच्या वतीने काष्टी येथे फुले - आंबेडकर जयंती संपन्न. जीवनगौरव पुरस्काराचे वितरण. डॉ. लोणकर, जयराम सोनोने व उत्तम वडवकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
बारामती सहकारी बॅंक काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत चेअरमन सचिन सातव यांचे प्रतिपादन.
सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सतरा वर्षानंतर गळाभेट!
तब्बल पंचवीस वर्षानंतर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नजीक रस्त्याने घेतला मोकळा श्वास
पत्रकार कुरुमकर व प्राचार्य खेडकर यांचा पत्रकार संघाकडून सन्मान
पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक क्षेत्राला अधिक बळ दिले -मुख्याध्यापक हौसराव दांगडे
दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खासदार सुप्रिया सुळे. रमेश आप्पा थोरात. आप्पासाहेब पवार. यांनी केले वंदन.
दीर्घायुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने चांगले विचार व गुरुने दिलेल्या संस्काराची सांगड घालावी मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीच्या निमीत्ताने. पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंदी.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक शिंदे याचा नवोदय परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक काय
पत्रकार कुरुमकर यांचा कानिफनाथ व लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून सन्मान
लिंपणगाव मध्ये हनुमान जयंती सोहळा उत्साही वातावरणात साजरा
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व भिम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
श्रीगोंदा शुगर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने. दौंड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग संपन्न. (बेकायदा अवैध धंदे बंद करा)