पुणे म्हाडाच्या अध्यक्ष पदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

By : Polticalface Team ,24-07-2024

पुणे म्हाडाच्या अध्यक्ष पदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

जनआधार न्युज प्रतिनिधी भिमसेन जाधव मो.9112131616

 पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळावर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली असून राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून दि. २३ जुलै रोजी या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला आहे . 

     सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे  निर्णय घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव जाहीर केले होते. मात्र लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद हे शासकीय लाभाचे पद असल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.

     पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आढळराव पाटील म्हणाले कि, पुणे म्हाडाचा कार्यभार सांभाळण्यासाठी व येथे काम करण्यास इच्छुक होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून गरीबांसाठी हक्काच घर ही  म्हाडाची संकल्पना अधिक वेगाने राबविणार आहे. याशिवाय म्हाडाच्या पुणे प्रादेशिक मंडळातील धोरणात्मक कामे हाती घेणे, कामकाजाचा आढावा घेणे, नवीन प्रकल्पांची उभारणी करणे, कामांची गुणवत्ता व दर्जा सुधारणे, जास्तीत जास्त नागरिकांना घरे निर्मितीचा लाभ मिळवून देणे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणे आदि कामे गतिमान पद्धतीने राबविण्यावर  माझा भर असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या नागरिकांना घर खरेदी साकारताना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या योजनाही कसोशीने राबविण्यात येतील असा विश्वास यावेळी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी  खासदर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.   


दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नियुक्तीमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील त्यांचे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून ठीकठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न