By : Polticalface Team ,02-08-2024
श्रीगोंदा प्रतिनिधि : ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन . प्रा. गणेश भोसले श्रीगोंदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात गुरुकुल प्रकल्प अंतर्गत गेस्ट लेक्चर साठी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा गावातील समाज भूषण पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गणेश भोसले यांना आमंत्रित करण्यात आले. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना व्याख्याते म्हणाले , काही लोक त्यांच्या पैशाला वेळेपेक्षा जास्त महत्त्व देतात, तथापि, सत्य हे आहे की वेळेपेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही. हीच वेळ आहे जी आपल्याला संपत्ती, समृद्धी आणि आनंद देते. जगात सर्व काही विकत घेऊ शकतो पण वेळ कोणीही विकत घेऊ शकत नाही. व्यक्तीकडे ज्ञान असेल तर भौतिक सुखे सहज उपलब्ध होऊ शकतात पण ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. व्यक्तीकडे असलेले ज्ञान कोणीही चोरू शकत नाही, त्यामुळे ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या यशाबाबत समाधानी न राहता अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.पूर्वी ज्याच्याकडे जास्त शेती, ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात मोठा श्रीमंत ,जिंकायचे असेल तर संघर्ष करावाच लागतो. स्वतःला ओळखायला शिकायचे कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. यावेळी प्राचार्य हौसराव दांगडे, पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे, रामदास पवार,मीनाक्षी कदम,राजेंद्र शेळके,प्रणव नलगे,लक्ष्मी बोलणे,महादेवी माने,संतोष भोईटे , विठ्ठल लेंडे, भगवान दिघे,शंकर यदलोड , सुमती सुरसे,रोशनी भवर , स्नेहल धुमाळ , याप्रसंगी उपस्थित होते.या बहारदार कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान दिघे यांनी केले .
वाचक क्रमांक :