राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट )नूतन तालुका अध्यक्ष सुभाषराव शिंदे यांचा नागरी सत्कार निमित्त सन्मान

By : Polticalface Team ,02-08-2024

राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट )नूतन तालुका अध्यक्ष सुभाषराव शिंदे यांचा नागरी सत्कार निमित्त सन्मान

 लिंपणगाव (प्रतिनिधी)सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे संचालक आणि मढे वडगाव चे सुपूत्र मा श्री सुभाष काका शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट)श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार केला. ग्रामपंचायत मढेवडगाव, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, मढेवडगाव, म्हातारपिंप्री, बाबूडी,शिरसगाव बोडखा या गावातील सर्व ग्रामस्थांच्या  वतीने हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.

लोकनियुक्त सरपंच मा प्रमोद शिंदे, चेअरमन मा प्रकाश उंडे, उपसरपंच मा राहुल साळवे, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष मा स्मितल भैय्या वाबळे मा चेअरमन बापूसाहेब वाबळे,पिंप्री चे  चेअरमन मा परेश भाऊ वाबळे, मा महेश तावरे, मा शहाजी हिरडे, उपसरपंच मा अनिल पोकळे यांच्या शुभहस्ते  हा नागरी सत्कार झाला.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा सुभाष काका शिंदे यांनी राजकारणात एकनिष्ठ राहिल्याने या पदापर्यंत पोहचू शकलो असे सांगितले. स्व शिवाजीराव बापू नागवडे तसेच मा श्री राजेंद्र दादा नागवडे आणि नागवडे कुटुंबाशी एकनिष्ठ राहून जनतेचा विश्वास संपादन केला त्यामुळे युवक काँग्रेसचा शाखा अध्यक्ष पासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास गेली 35 वर्षे  सहकार क्षेत्रात काम करून अखंडपणे चालू आहे. लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात उपस्थित असल्याने राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोक प्रेम करतात. या पदाचा उपयोग गावच्या विकासासाठी नक्कीच करून घेईल. तरुणांनी एकनिष्ठ राहून समाजकारण करावे असा सल्ला ही त्यांनी या प्रसंगी दिला.

मा प्रमोद शिंदे,मा स्मितल भैय्या वाबळे, उपप्राचार्य एस एन उंडे सर,मा राहुल साळवे, मा महेश तावरे, मा साहेबराव उंडे, मा संतोषराव गुंड साहेब,मा पंडितराव वाबळे, मा हनुमंत झिटे,प्रा योगेश मांडे,मा नवनाथ उंडे,मा रावसाहेब मांडे यांची शुभेच्छा पर भाषणे झाली

या कार्यक्रमाला श्री नानासाहेब मांडे,मा गेना नागू मांडे, मा संपत मोहिते, मा मुख्याध्यापक ससाणे सर, मा डॉ अनंत पवार, मा बापू निवृत्ती मांडे, मा अनिल शंकर शिंदे, मधुकर शिंदे, बाळासाहेब नथु मांडे,बापूराव शिंदे,वैभव तावरे, महेश थोरात, लालासाहेब जहागीरदार, जगगु मामा पाटोळे, संतोष सोमवंशी, विलास महामुनी,मा सरपंच प्रवीण शिर्के, शंकर मांडे, महादेव गरड,भिमराव फरकांडे,मुख्याध्यापक शरद उंडे, रावसाहेब जाधव, वसंत साळवे,बाळासाहेब फाफळे, कृषी अधिकारी शिंदे साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सोसायटी संचालक,ग्रामसेवक, शिक्षक,  चारही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एन टी पवार यांनी केले तर आभार मा निळकंठ उंडे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.