By : Polticalface Team ,Sat Dec 25 2021 10:15:24 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव प्रतिनिधी ..
श्रीगोंदा तहसील कार्यालय मध्ये ग्राहक दिनाचे आयोजन केले होते .परंतु श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे व तालुका वैद्यकीय अधिकारी संघर्ष राजुळे हेच दोनच अधिकारी उपस्थित असल्यामुळे उपस्थित मान्यवरांनी तीव्र नाराजी केली .अनुपस्थित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना खुलासा मागण्याचे आश्वासन तहसीलदार मिलिंद कूलथे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले . प्रा.विजय निंभोरे यांनी ग्राहक चळवळ ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक संघटना याविषयी माहिती दिली .दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी श्रीगोंदा पालिकेतील चाललेल्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.शरद नागवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग करत असलेला सर्व रस्त्यांची तक्रार मांडली, यावेळी ग्राहक संघटनेचे शिवाजी साळुंके ,सतीश ओहोळ (सर), बलभीम पठारे ,गोवर्धन वागस्कर , नंदकुमार कु रूमकर इत्यादी मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा अधिकारी साळुंके यांनी केले तर आभार पुरवठा निरीक्षक पाचरणे यांनी मांडले
वाचक क्रमांक :