न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात शिक्षण सप्ताहाची सांगता

By : Polticalface Team ,03-08-2024

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव  विद्यालयात शिक्षण सप्ताहाची सांगता लिंपणगाव (प्रतिनिधी)--न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या दरम्यान विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . या सप्ताहातला पहिला दिवस विद्यालयातील उपशिक्षिका लक्ष्मी बोलणे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी बांबूच्या काड्या पासून गणितीय साहित्य तयार केले .कार्डशिट पासून मुखवटे तयार केले ,टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य बनविले इत्यादी शैक्षणिक उपयोगी साहित्य बनवण्याचे कार्य करण्यात आले. दिवस दुसरा विद्यालयातील उपशिक्षिका सुमती सुरसे यांनी प्रार्थनेला मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस याविषयी माहिती दिली. दिवस तिसरा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाचे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिवस चौथा विद्यालयातील उपशिक्षक भगवान दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कलागुणांचे कार्यक्रम सादर करण्यात आले . दिवस पाचवा. विद्यालयातील उपशिक्षक वैभव काळोखे यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचे फायदे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिवस सहावा संतोष भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात इको क्लब स्थापन करण्यात आला तसेच शालेय पोषण आहार दिवस साजरा करण्यात आला. दिवस सातवा. रामदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गणेश भोसले तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान दिले. तसेच माजी लष्करी अधिकारी धनंजय मांडे यांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलाच्या भरती विषयी मार्गदर्शन केले. शंकर यदलोड यांनी व्याख्यात्यांचे आभार मानले. अश्या पद्धतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे व पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले....
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी