By : Polticalface Team ,Sat Dec 25 2021 10:44:17 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदे :- २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून देशभर साजरा होत असतो .या निमित्ताने ग्राहक जागृतीसाठी प्रशासना बरोबर ग्राहक संघटना या निमित्त विवीध कार्यक्रम आयोजित करत असतात श्रीगोदयात मात्र महसूल विभागाच्या पुरवठा शाखेने आयोजित केलेल्या ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात बहुतांशी शासकीय अधिकारी आणि संस्थाच्या प्रतिनिधी यांनी पाठ फिरवली तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी मात्र बाजू सावरत जे अधिकारी आणि कार्यालय प्रमुख ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले त्यांच्याकडे खुलासा मागणार असल्याचे आपल्या भाषणात म्हणाले .
महसूल विभाग आणि पुरवठा शाखेने तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने सायंकाळी चार वाजता ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , यावेळी प्रस्तावित पुरवठा अधिकारी दत्तात्रय साळुंके यांनी केले .यावेळी प्रा.विजय निंभोरे यांनी ग्राहक चळवळ आणि ग्राहक संघटना यांची माहिती दिली.तर त्यांनी बोलताना सर्व शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला कायमच अनुपस्थित राहत असल्याचे सांगितले .दक्ष नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी पालिकेच्या विविध कामात होत असलेला गलथान कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले.शरद नागवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले .
यावेळी बोलताना तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले की ग्राहकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. या ग्राहक दिनाला जे अधिकारी आणि कार्यालय प्रमुख उपस्थित नसतील त्यानं विचारणा करणार असून त्यांच्याकडे खुलासा मागणार आहोत . पुढील ग्राहक दिन व्यापक स्वरूपात घेण्यात येईल .त्यामध्ये ग्राहकांचे सहा हक्क बाबतीत जागृती तसेच ग्राहकांच्या समस्या निराकरण यावर जोर देण्यात येईल. यावेळी ग्राहक संघटनेचे शिवाजी साळुंके, सतीश ओहोळ ,पुरवठा निरीक्षक पाचर्णे ,स्वस्त दुकानदार संघटनेचे बलभीम पठारे ,गोवर्धन वागसकर ,मुख्याधिकारी मंगेश देवरे ,तालुका वैद्यकीय अधिकारी संघर्ष राजुळे आदी उपस्थित होते
वाचक क्रमांक :