By : Polticalface Team ,04-08-2024
मयत सुरज भुजबळ याची आई सुवर्णा भुजबळ यांनी बोलताना सांगितले. या संदर्भात यवत पोलीसांनी वेळीच दखल घेऊन आरोपी १)अमित यशवंत बहिरट २) समिर यशवंत बहिरट याचा बंदोबस्त केला असता तर आज ही दुरदैवी घटना घडली नसती. आणि सुरज भुजबळ याचा जीव वाचला असता असे सांगितले. सदर घटनेला नेमके जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही. यवत पोलीस प्रशासनाने कर्तव्याचे पालन केले नाही. पोलीस प्रशासनाच्या कामगिरी बाबत नागरिकांनमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस कर्मचारी यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शनिवार दि ०३/०८/२०२४ रोजी खामगाव गाडमोडी चौकातील राहुल सिलेक्शन या कपड्यांच्या दुकानात आरोपी अमित बहिरट हा धारदार कोयता पाठीमागे धरुन दुकानात घुसला व सुरज भुजबळ यास धारदार कोयत्याने वार करून दुकानाच्या बाहेर ओढून परत सपासप कोयत्याने मानेवर वार केल्याने सुरज भुजबळ याचा जागीच मृत्यू झाला दुर्दैवी घटना दि ०३ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० दरम्यान खामगाव गाडमोडी चौकात घडली असल्याने एकच खळबळ उडाली होती. आरोपी अमित यशवंत बहिरट स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर झाला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सूरज भुजबळ याचा मृतदेह यवत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला असून सदर खुनाच्या अनुषंगाने संबंधित आरोपी १) अमित यशवंत बहिरट २) समिर यशवंत बहिरट याचे विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गु.र.नं.784/2024 बी.एन.एस 103(1),351(2)(3),352,3(5) अंन्वेय गुन्हा रात्री उशिरा पर्यंत दाखल करण्यात आला आहे.
वाचक क्रमांक :