By : Polticalface Team ,04-08-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल 98 50 68 63 60 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना गावखेड्यात जावुन शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन शाखा स्थापना तसेच शाखा नूतनीकरण, रिक्त पदांच्या नेमणुका, बुथ यंत्रणेचा आढावा घेण्याच्या सुचना मातोश्रीवर झालेल्या बैठकीत दिल्या आहेत .त्या अनुषंगानेच शिवसेना करमाळा विधान सभा संपर्कप्रमुख गणेश (राजू )राणे यांच्या उपस्थितीत आजपासून करमाळा तालुक्यात "भगवा सप्ताह" अभियान सुरू होणार आहे ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट पर्यंत हे अभियान सुरू रहाणार आहे. अशी माहीती शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात फरतडे यांनी म्हटले आहे की प्रत्येक पंचायत समीती गणात जावुन जेष्ठ शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे.त्याचबरोबर नवीन शाखांची स्थापना, शाखा नूतनीकरण करून सदस्य नोंदणी केली जाणार आहे तसेच विधानसभा क्षेत्रातील नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने मतदार यादी तपासून त्यातील त्रुटी दुरुस्त कार्यक्रम देखील राबविण्यात येणार आहे.
पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्य काळात राज्याच्या शेतकऱ्यांना कर्ज माफी, शेती मालाला दिलेला भाव, विविध लोकहितार्थ राबविल्या गेलेल्या योजना व घेतलेले निर्णय, कोरोना काळातील महाभयंकर सकंटावर केलेली नियोजनबध्द मात, या सर्व लोकोपयोगी कार्यांना उजाळा देण्यात येणार आहे.
तसेच घटनाबाह्य सरकारकडुन राज्यात सुरु असलेली हुकुमशाही जाती पातीच्या नावावरील भेदभाव व आरक्षणाच्या नावाखाली जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणे, याविषयी या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने घरोघरी जावुन शिवसैनिक व पदाधिकारी व्दारा जनतेसमोर वाचा फोडुन या ढोंगी सरकारचा फडदाफाश करुन जनतेला जागृत करण्यात येणार असून ११ ऑगस्ट रोजी तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन या भगवा सप्ताह ची सांगता केली जाणार आहे.
भगवा सप्ताह अभियानात शिवसेना ,युवासेना ,महिला आघाडी युवतीसेना चे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे देखील फरतडे यांनी सांगीतले आहे.
वाचक क्रमांक :