सर्व सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-ना.विखे पाटील

By : Polticalface Team ,08-08-2024

सर्व सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-ना.विखे पाटील

प्रतिनिधी,

अहमदनगरच्या नागरी दळणवळण सुविधा सुलभ होण्यासाठी तिनही उड्डाणपुलाचे भूमिपूजन  महाराष्ट्राचे महसूल मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते करण्यातआले.

डीएसपी चौक,सन फार्मा चौक व सह्याद्री चौक एमआयडीसी येथे तिन्ही उड्डाणपूलाचे भूमिपूजन पूजन करतेवेळी ना.विखे पाटील यांनी सांगितले की अहमदनगरचा विकासपर्व सुरू असून त्याच माध्यमातून अहमदनगरच्या वैभवा मध्ये आणखी तीन उड्डाणपूलांची भर पडेल.         

          यावेळी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मेजर नीलकंठ उल्हारे व त्यांचे सहकारी रवींद्र इंगळे मेजर, रघुनाथ दांगट मेजर, अनिल सत्रे व लहू सुलाखे मेजर यांनी निवेदन देऊन सैनिक,अर्धसैनिकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी नामदार विखे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना महसूलच्या पंधरवडा मध्ये सैनिकहो तुमच्यासाठी या कार्यक्रमात सर्व सैनिकांचे प्रश्न तात्काळ मार्गे लावण्याबद्दल सुचित केले, व अस्वासित केले की महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्व सैनिक ,अर्धसैनिकांच्या  आजपर्यंतच्या सर्व समस्या समाधानासाठी ५ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या महसूल पंधरवड्या अंतर्गत कामे मार्गे लावण्यात येथील.

संस्थेच्या वतीने सैनिक अर्धसैनिकांची मुख्य मागणी जमिनीच्या संबंधित अनेक तक्रारीचे निवारण करणे होते. याचप्रमाणे अर्धसैनिकांच्या अनेक मागण्या  विचाराधीन आहेत. त्यासाठी  मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मीटिंग आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

       आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या माजी सैनिकांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे होते. याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्धसैनिकांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय स्थापन करावे व जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक शहर व ग्रामपंचायतच्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आजी-माजी सैनिकांचा रीतसर  सर्व्हे करून मिळावा व त्यांची नोंदणी अर्धसैनिक कल्याण कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात असावी जेणेकरून त्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता येतील अशा आशयाचे प्रमुख मुद्दे निवेदनात नमुद करण्यात आले आहेत. 

या कार्यक्रमाचे नियोजन ग्रा. स.आप्पासाहेब (बंडुनाना) सप्रे यांनी केले होते .

         यावेळी उपस्थित आमदार संग्रामभैय्या जगताप, मा.आ.शिवाजी कर्डिले, नगरसेवक संपत बारस्कर, निखिल वारे ,डॉक्टर बोरुडे ,दत्ता सप्रे , राजेंद्र कातोरे,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब (बंडूनाना)सप्रे, महेश कांडेकर, संजय भोर, धनराज सप्रे बाळासाहेब मोरे, दीपक जाधव, दीपक बरे, नितीन खंडारे (दाजी) आकाश कोल्हाळ, संकेत गुंजाळ, शुभम हजारे व रामभाऊ घाडगे आदि उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.

अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा

ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम

सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.

रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.

चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश

मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज‌. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.

व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी

रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.

लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे

ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव

आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन

के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह‌ सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.

स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत

विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.