नागवडे कारखाना पदाधिकारी, संचालक व कामगार यांचेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा - संदिप नागवडे.
By : Polticalface Team ,Mon Dec 27 2021 18:29:46 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी:- स.म.शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा फॅक्टरी, तालुका-श्रीगोंदा या संस्थेची निवडणूक लागलेली असताना, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ कब व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील नियम ३(III)परिपत्रकानुसार, सहकारी संस्थाचे सेवक या शीर्षकाखाली ज्या सहकारी संस्थेची निवडणुक घोषीत झाली आहे, त्या सहकारी संस्थेचे सेवक आपले दैनंदिन कामकाज सुरु ठेवतील. तथापी संस्थेचा कोणताही सेवक, त्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेणार नाहीत. सहकारी संस्थेच्या सेवकाने निवडणुकीमध्ये व प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवारासाठी अथवा पॅनेलसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होवू नये. असा आदेश असताना देखिल स.म.शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा फॅक्टरी, कारखाना सेवक व कारखाना अंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थेतील सेवक प्रचारामध्ये शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनेल चा प्रचार करत आहेत. हा आचार संहितेचा भंग आहे. तरी त्यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात यावा. अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष संदिप नागवडे यांनी केली आहे.
तसेच विश्रामगृहाच्या वापराबाबत आचारसंहिता परिपत्रकानुसार संस्थेच्या संचालक मंडळाने आचारसंहिता कालावधीत आचारसंहिता लागू असलेल्या कार्यक्षेत्रात अथवा कार्यक्षेत्राबाहेर संस्थेच्या खर्चाने दौरे करू नयेत, संस्थेच्या विश्रामगृहाचा वापर संचालकास,उमेदवारास अथवा इतर कोणासही आचारसंहिता कालवधीत करता येणार नाही. तसेच सहकारी संस्थेची वाहने व कर्मचारीवर्ग यांचा निवडणुकीच्या कामकाजासाठी विद्यमान पदाधिकारी व संचालकांनी कोणत्याही परिस्थितीत वापर करू नये या नियमाचेही विद्यमान पदाधिकारी व संचालक यांचेकडून उल्लंघन होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी करून आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे संदीप नागवडे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी, स.म.शि.ना.नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा फॅक्टरी तहसील कार्यालय, श्रीगोंदा. यांचेकडे केली आहे. तसेच कारवाई न केल्यास सर्व पुरावे कोर्टात सादर केले जातील. यामध्ये कर्मचार्यांच्या नोकऱ्या गेल्यास त्यास सर्वस्वी कामगार व शिक्षण संस्थेतील सेवकच जबाबदार राहतील असा इशारा नागवडे यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद