छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पूर्व मुलाखत ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळावा २०२४ आयोजन अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,22-08-2024

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पूर्व मुलाखत ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळावा २०२४ आयोजन अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

लिंपणगाव (प्रतिनिधी)- सौ अनुराधाताई राजेंद्र नागवडे विचारमंच आणि श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व मुलाखत ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळवा 2024 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

     श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की;  श्रीगोंदा आणि परिसरातील सुशिक्षित होतकरू पूर्व गरजू पदवी आणि पदवीतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली यांच्यासाठी शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट 2024 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यंत दररोज सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत पूर्व मुलाखत तयारी मोफत प्रशिक्षण आणि शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रोजगार मेळावा सकाळी ठीक १० वाजता पार पडणार आहे. पुढे बोलताना श्री नागवडे आणखी म्हणाले की; पुणे परिसरातील 15 पेक्षा जास्त विविध नामांकित बँकिंग/ फायनान्स इंडस्ट्री मधील 400 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अगोदर होणाऱ्या ट्रेनिंग मधून विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीला सामोरे जाण्याअगोदर आत्मविश्वास निर्माण होणार आहे. असे देखील श्री नागवडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

    अधिक माहिती देताना नागवडे आणखी पुढे म्हणाले की; पुणे परिसरातील पिंपरी चिंचवड; शिवाजीनगर; पुणे स्टेशन परिसर; विमान नगर; मगरपट्टा सिटी; बंडगार्डन; येरवडा परिसर आणि इतर सर्व पुणे विभाग हे कार्यक्षेत्र नोकरीच्या ठिकाणी असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बीए; बी कॉम; बीएससी; बीसीए; बीसीएस; डिप्लोमा; एम कॉम; एम एससी; आदी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच पदवीत्तर मधील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यात सामील होऊ शकतात. असे देखील नागवडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास 18 कंपन्या व बँका सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने नोकरीचे ठिकाण व कंपनी यादी पुढीलप्रमाणे:- किवीस कॉर्पोरेशन लिमिटेड; कॅलिबर सर्विसेस लिमिटेड; जेनियस प्रायव्हेट लिमिटेड; क्यू कनेक्ट लिमिटेड; दुआॢझ एच आर सर्विसेस; ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड; आर्मैका प्रायव्हेट लिमिटेड; अल्ट्रा स्टेट लिमिटेड;  सॉफ्टजन लिमिटेड; एचडीएफसी बँक; स्टेट बँक ऑफ इंडिया; ॲक्सिस बँक; आवास फायनान्स लिमिटेड; टेक महिंद्रा; डब्ल्यू एन एस लिमिटेड; इन्फोसिस लिमिटेड ;माइस्ट्रोरियल  टेक; आय प्रोसेस लिमिटेड इत्यादी कंपन्या व बँका सहभागी होणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

    नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की; विद्यार्थ्यांनी त्या अगोदर दिलेल्या गूगल फॉर्म लिंक वर क्लिक करून किंवा क्यू आर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी पूर्ण करून घ्यावी; आणि शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक ८.३०  वाजता कॉलेजमध्ये ऑफलाईन नोंदणी करता महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान सहा दिवस ट्रेनिंग आणि सातव्या दिवशी रोजगार मेळावा असे नियोजन आहे. या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवावा ;असे आवाहन अनुराधाताई राजेंद्र नागवडे विचारमंच तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

      या आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; नागवडे कारखान्याचे संचालक सर्वश्री सुभाषराव शिंदे; विश्वनाथ गिरमकर; मारुती पाचपुते; योगेश भोईटे; विठ्ठल जंगले; भाऊसाहेब नेटके; भाऊसाहेब बरकडे संदीप औटी; डी आर काकडे; विजय मुथा; सौ सुरेखा लकडे; प्राचार्य डॉ. सतीषचंद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.