चौसाळा येथील आदीवासी भटके विमुक्तांच्या निधीचे बीड जिल्हाधिकारी यानी दिले चौकशीचे आदेश--विवेक कुचेकर
By : Polticalface Team ,Tue Dec 28 2021 21:15:54 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी: बीड तालुक्यातील चौसाळा हे वीस ते पंसविस हजार लोकसंख्येच्या आसपास शहर असुन या शहरापासुन जवळच असलेल्या धोञा वस्तीवर गेल्या तीस वर्षापासुन वास्तव्य करत असलेल्या गोपाळ व पारधी समाज वास्तव्य करत असुन पंरतु आज पंर्यत येथिल रहीवाशाना साधे रेशनकार्ड सत्ताधारयानी उपलब्ध करून दिले नाही सध्दपरिस्थीत या वस्तीत चोहीकडे चिखल झाला असुन रहदारीसाठी येथील रहिवाशांना साधा रस्ता देखील नाही व तसेच येथील रहिवाशांना आजपंर्यत शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ दिला गेलेला नाही
चौसाळा शहरातील बेलदार, गोपाळ, कैकाडी,पारधी समाजाला घरकुल योजनेपासुन वंचित ठेवण्याचे महापाप सत्ताधारी मंडळीनी केले आहे या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक कुचेकर यानी बीड जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी करून चौसाळा येथील गोपाळ, कैकाडी,बेलदार,पारधी समाजाला न्याय देण्याची मागणी केली होती या निवेदनाची दखल घेवुन बीड जिल्हाधिकारी साहेबांनी बीड तहसीलदार याना चौकशीचे आदेश दिले आहेत
वाचक क्रमांक :