श्री.सद्गुरू नारायण महाराज यांचे रोटी घाटात स्मारक व्हावे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार. आमदार राहुल कुल.
By : Polticalface Team ,24-08-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील
श्रावणमास निमित्ताने कै.सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण, सन्मान सोहळा व कीर्तन महोत्सव सांगता समारंभ आज यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे पार पडल्या, या प्रसंगी
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले.जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा दौंड तालुक्यातून पंढरपूर कडे मार्गस्थ होत असतो. त्यामुळे तालुक्याला देखील मोठा सांप्रदायिक वारसा लाभला आहे. तालुक्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, भजनी मंडळांना व्यासपीठ मिळावे या हेतूने. भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सव सांप्रदायिक भजन मालीका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दौंड तालुक्यातील विविध ठिकाणांहून या स्पर्धेसाठी वारकरी संप्रदायातील एकूण ८० भजनी मंडळानी सहभाग घेताला होता.
त्यापैकी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.श्री.विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, (स्वामी चिंचोली) द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक. श्री.राजेश्वर भजनी मंडळ,(राजेगाव) तृतीय क्रमांकाचे पारितोषिक. श्री.सावतामाळी भजनी मंडळ.(नानगाव) तसेच उत्तेजनार्थ परितोषिक श्री.विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, (डाळिंब) स्वरांगण भजनी मंडळ, (गोपाळवाडी) बोराटेवस्ती भजनी मंडळ, (नांदुर ) श्रीराम भजनी मंडळ, (केडगाव) विभागीय विजेते श्री.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, (कामठवाडी) भैरवनाथ भजनी मंडळ, (खडकी) नागेश्वर भजनी मंडळ. (पाटस) संत यादव बाबा भजनी मंडळ, (वडगाव बांडे) विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, (खोर) यादववाडी भजनी मंडळ. खामगाव विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ. (पारगाव) या भजनी मंडळांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे गायन वादन करुन उपस्थित वारकरी संप्रदायातील भाविकांचे लक्ष वेधले होते.
तालुक्यातील २५० हून अधिक मंदिराच्या समोर सभामंडप बांधकाम जीर्णोद्धार, तसेच मंदिरांसाठी पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी, मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देणे बाबत. नेहमीच पुढाकार घेतला आहे. दौड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांडवकालीन श्री भुलेश्वर मंदिराला वन पर्यटन मधुन निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे दौंड तालुक्यातील वारकऱ्यांसाठी. वारकरी भवन नाही. भाविकांच्या सोयीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. तसेच ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी मागणी केल्या प्रमाणे रोटी घाटात श्री.सद्गुरू नारायण महाराज यांचे स्मारक उभारणार असल्याचा विश्वास आमदार राहुल कुल यांनी उपस्थितांना दिला. या वेळी माजी आमदार श्रीमती. रंजनाताई कुल, ह. भ. प. गुरुवर्य श्री.सुदाम गोरखे गुरुजी, ह. भ. प. श्री.सुमंत महाराज हंबीर, ह. भ. प. श्री.सुरेश महाराज साठे, ह. भ. प. श्री.गुलाब महाराज लवंगे, ह. भ. प. श्री.नाना महाराज दोरगे, ह. भ. प. श्री. सोळसकर महाराज, ह. भ. प. श्री.दिपक महाराज मोटे, सौ.कांचन कुल यांच्यासह तालुक्यातील सर्व वारकरी कीर्तनकार, मृदुंगचार्य, गायनाचार्य, हार्मोनियम वादक टाळकरी तसेच वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.