इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र पहिले अधिवेशन तयारी सुरूः किशोर हंबर्डे

By : Polticalface Team ,Wed Dec 29 2021 09:37:24 GMT+0530 (India Standard Time)

इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र पहिले अधिवेशन तयारी सुरूः किशोर हंबर्डे आष्टी प्रतिनिधी: आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲड. बी. डी‌. हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथे इतिहास संकलन योजना, नवी दिल्ली संलग्न इतिहास संकलन संस्था, महाराष्ट्रचे पहिले अधिवेशन दि. ०३ व ०४ जानेवारी २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी सध्या सुरू असून आष्टी पंचक्रोशीतील एक आगळे वेगळे अधिवेशन ठरविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे स्वागत अध्यक्ष किशोर हंबर्डे यांनी सांगितले.‌ यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, हे अधिवेशन भारतीय इतिहास संशोधन परीषद, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने होत असून आधुनिक भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन विशेष संदर्भ महाराष्ट्र याविषयावर होत असून भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त हे अधिवेशन महत्वपूर्ण ठरणार आहे. आष्टी पंचक्रोशीला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पण इतिहासात म्हणावे तसे यांचे योगदानाची नोंद घेण्यात आली नाही. नाथ,शैव, महानुभाव संप्रदायाचे महत्वपूर्ण ठिकाण असलेली ही पुण्यभूमी आहे, शेख महंमद बाबा सारख्या सर्वधर्म समभाव बिबवणार्या वारकरी संप्रदायीची ही भूमी आहे, त्यामुळे या पहिल्या अधिवेशनाचे एक वेगळे महत्त्व आहे. सध्या कोरोनाच्या नविन ओमेक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता अधिवेशनासाठी कोरोना नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे, त्यानुसार मास्क, सेनिटायझर वा योग्य अंतरावर असण व्यवस्था आदी सर्व नियमाचे पालन होणार आहे. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी सांगितले की, अधिवेशनासाठी आवश्यक त्या सर्व मुलभूत सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहेत, अधिवेशनासाठी संपुर्ण भारतातून दोनशेच्यावर इतिहास संशोधक, अभ्यासक येणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून डॉ. बालमुंकूद पांडे, संघटक, इतिहास संकलन योजना, नवी दिल्ली हे उपस्थित राहणार आहेत तर बिजभाषक म्हणून भारतीय इतिहास संशोधन परीषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जेष्ठ पूरातत्वज्ञ डॉ. गो. ब.‌देगलूरकर, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळचे माजी संपादक डॉ. अरूण चंद्र पाठक, भारतीय इतिहास संशोधन परीषद, नवी दिल्ली चे उपाध्यक्ष डॉ. ओम उपाध्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, इतिहास संकलन योजना नवी दिल्ली चे उपाध्यक्ष डॉ. शरद हेबाळकर, औरंगाबाद विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. व्यंकटेश लांब, नांदेड विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव दंदे, अमरावती विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. संतोष बनसोड, जळगाव विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. सुनील अमृतकर हे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय अखिल महाराष्ट्र इतिहास परीषदेचे अध्यक्ष डॉ. सतिश कदम, इतिहास संकलन संस्था महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.‌राधाकृष्ण जोशी व संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त इतिहास संशोधकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी अधिवेशन स्थानिक सचिव डॉ. रवी सातभाई, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सखाराम वांढरे हे उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद