अखेर सोलापूरवाडी ते कडा पर्यंत धावली रेल्वे सोलापूर वाडीत स्टेशन वर पूजन संपन्न, कडा येथे अधिकाऱ्यासह रेल्वे चे स्वागत
By : Polticalface Team ,Wed Dec 29 2021 20:10:29 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी/बीड (प्रतिनिधी-गोरख मोरे) : बीड जिल्हा वासियांचा जिव्हाळ्याचा अहमदनगर-बीड-परळी रेल्वे प्रश्न आज अखेर बुधवार दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर-सोलापूर वाडी-कडा पर्यंत ४१ किलोमीटर अंतरावर १२ डब्यांची रेल्वे धावली असून दुपारी २ वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी कडे रवाना होणार असून आष्टी येथे ४ वाजता खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून नंतर हिरवा झेंडा दाखवून आष्टी-कडा-धानोरा-सोलापूर वाडी ते अहमदनगर हाय स्पीड रेल्वे धावणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदनगर ते आष्टी ६१ किलोमीटर अंतरावरील लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून हाय स्पीड रेल्वे ताशी १४४ किलोमीटर धावणार असल्याचे सांगितले .
सोलापूर वाडी स्टेशन येथे पूजन करण्यात आले असून कडा येथे रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या वतीने दक्षिण मुंबईचे मुख्य मनोज आरोरा, सह मुंबई येथील रेल्वे अधिकारी यांचे कडा येथे स्वागत करण्यात आले .
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष दीपक जाधव उर्फ गरुड, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, राजेश राऊत, रघुनाथ कर्डिले, बा म पवार, बलदोटा, शंकर देशमुख, नागरगोजे, ईबू भाई सय्यद, विशाल घोडके, सचिन खंडागळे, अमोल साळवे, संजय खंडागळे आदी सर्व स्तरातील नागरिक या प्रसंगी उपस्थित होते .
अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत, राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी पुन्हा ९० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले .
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावर सोलापूर वाडी स्टेशन-धानोरा-कडा रेल्वे धावल्याने रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद