ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान

By : Polticalface Team ,06-09-2024

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान ! (श्रीगोंदा प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात निस्वार्थीपणे भरीव योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी नुकतीच घारगाव येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या यशंतराव चव्हाण विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी शाळेची शिस्त; गुणवत्ता व विद्यालयाचा सर्वांगीण विकास पाहून पत्रकार कुरुमकर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड यांच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली. यावेळी पत्रकार कुरुमकर यांचा ज्येष्ठ शिक्षक व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमजान हवालदार सर यांनी विद्यालयातर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार कुरुमकर यांच्या कार्यकर्तुत्वावर बोलताना शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमजान हवालदार यावेळी म्हणाले की; पत्रकार नंदकुमार कुरुमकर आणि माझे बालपणापासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत श्री कुरुमकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असताना पत्रकारिता क्षेत्रातही उत्तम प्रकारे कामगिरी बजावली. ते अत्यंत संयमी व शांत स्वभावाचे असून अल्पावधीतच श्री कुरुमकर यांनी आपली जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. त्यांचे लिखाण सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी असून; त्यांचे जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघातही मोठे मौलिक मार्गदर्शन लाभत आहे. असे सांगून श्री हवालदार सर पुढे म्हणाले की; जिल्ह्यात एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. राजकीय; सामाजिक; धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राच्या अचूक घडामोडींची अभ्यासपूर्ण बातमीतून त्यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. पत्रकार कुरुमकर यांची नुकतीच तालुक्यातील पत्रकार बांधवांनी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड केली. ही त्यांच्या अभ्यासपूर्ण लिखाणाची पावती म्हणावी लागेल. असे सांगून पत्रकार कुरुमकर यांना पुढील कार्यास श्री हवालदार सर यांनी विद्यालयातर्फे शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शुभेच्छापर भाषणात ज्येष्ठ शिक्षक रवींद्र भोंडवे सर यावेळी म्हणाले; की पत्रकार कुरुमकर यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून प्रत्येक घटकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व समावेशक लिखाण करून अनेकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. पत्रकार कुरुमकर हे आमच्या लिंपणगावचे भूषण आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्राला पत्रकारितेच्या माध्यमातून गुणवंतांसह विविध उपक्रमांना ते सतत न्याय देतात. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्हालाही नेहमीच त्यांचे मार्गदर्शन लाभत असते. त्यातून आम्हाला देखील प्रेरणा मिळते. त्यांच्या निवडीबद्दल आम्हा लिंपणगावकरांचा. बहुमान आहे असे सांगून श्री भोंडवे सर यांनी पत्रकार कुरुमकर यांचे भरभरून कौतुक केले. या व्यासपीठावर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब जगताप सर; रवींद्र भोंडवे सर; सचिन शेलार सर; विवेकानंद काळे सर; आप्पासाहेब नलगे सर श्रीमती शकुंतला मोरे मॅडम; ढगळे डि के; सर; बाळासाहेब शिंगाडे सर; बाळासाहेब पवार; राजेंद्र लगड; पंडित लष्करे; आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.