अश्लील भाषा वापरल्या प्रकरणी प्रविण कुरूमकरवर गुन्हा दाखल..
By : Polticalface Team ,Thu Dec 30 2021 13:27:59 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक ३० डिसेंबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील लिंपणगाव या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या रामरावं बाबुराव ओहोळ व इतर दोन या मागासवर्गीयांचे गट नंबर २३६ मधील क्षेत्र बापू माने यांनी अधिकृत खरेदी केलेले आहे. असे असतांनाही या क्षेत्रावर काही लोकं अतिक्रमण करून, ही जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने आपले कोणी काही करू शकत नाही. या अविर्भावात काही जण लिंपणगाव कार्यक्षेत्रात वावरतांना दिसताहेत. प्रवीण कुरुमकर हे त्यातीलच एक उदाहरण..!
यापूर्वी घडलेल्या अनेक वादातीत प्रकरनांत कुरूमकर असल्याचे समजते आहे. लोकांना दम देणे, अश्लील भाषा वापरणे, उलटा टांगुन मारू का.?, मी कोण आहे..? ओळखलं का..? माझ्या नादी लागू नका..! अशा पद्धतीचा सज्जड दम देऊन, तोडफोडीची आणि जाळपोळीची भाषा करणारा हा इसम राजकीय पदाधिकारी आहे.
काल प्रवीण कुरूमकरने सामाजिक कार्यकर्ते बाप्पू बाबा माने यांना अश्लील शिवीगाळ करत, मारहाण करण्याची भाषा वापरल्याने, माने यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण कुरूमकरवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, लिंपणगाव स्थित नमूद गट नंबर २३६ मधील क्षेत्र बापू माने यांनी खरेदीखताने अधिकृत विकत घेतले आहे. मात्र, शेजारी असलेल्या प्रवीण कुरुमकर व इतर काहींचा या क्षेत्रावर डोळा आहे. या क्षेत्रांमध्ये अनाधिकाराने जाणे, बळजबरीने झाडं तोडणे अशी गैरकृत्य करून, परिसरातील सर्वसामान्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत बाप्पू माने यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
त्यांनी यावेळेस नमूद केले की, माझ्यावर अन्याय होत आहे. समोरचे इसम राजकीय पार्श्वभूमी असलेले धनदांडगे व शक्तिशाली आहेत. मी सर्वसामान्य भटक्या जमातीचा इसम असून, मला दडपण्यासाठी हे वरिष्ठ लोक प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन मला दाद देत नाही. माझे सगळे रीतसर आहे. मात्र, तरीही मला न्याय मिळत नाही. यामुळे मी सदरील विषय माध्यमांपुढे मांडत आहे.
माझ्या क्षेत्रातील चिंचेची आणि बाभळीची झाडे तोडून, त्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने प्रवीण कुरुमकर हा इसम दंडेलशाही करतोय. याची विचारणा केली म्हणून, मला अश्लील, अपशब्द वापरून, उलटे टांगून मारण्याची भाषा केली. मी फुले, आंबेडकरी विचारधारेचा असून, अनेक वर्षांपासून पुरोगामी चळवळीत कार्यरत आहे.
मला प्रवीण कुरुमकर लिंपणगाव यांनी असंविधानिक भाषा वापरल्यामुळे मी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही येथील ओहोळ कुटुंबियांना नाहक त्रास दिला गेला. परंतु, कुरुमकरांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे कोणताही दखलपात्र गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला नाही. लिंपणगाव येथील वृक्ष तोडीबाबत वन विभागाकडे तक्रार करणार असून, लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून, हक्काची जमीन मिळवण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे माने यांनी माध्यमांना सांगितले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.