सदाण्णांचे नाव पुढे करून दिशाभूल करण्याचा डाव :- नाहाटा व पाचपुते
By : Polticalface Team ,Thu Dec 30 2021 15:43:24 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा = स्व. सदाशिव पाचपुते यांचे नाव पुढे करून नागवडे सहकारी कारखान्यात सभासदांची दिशाभूल करण्याचा डाव विरोधकांमार्फत आखला जात आहे. हा डाव सुज्ञ सभासद निवडणुकीत हाणून पाडतील. सदाण्णा आज असते तर विरोधकांची पळताभुई थोडी झाली असती हे सर्व तालुक्याला ज्ञात आहे. बबनराव पाचपुते गट हा एकसंघ आहे आणि तो यापुढे ही कायम राहील यात कसलीही शंका नाही, असे मत माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व काष्टीचे उपसरपंच सुनील पाचपुते यांनी व्यक्त केले.
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. यात सदाण्णांना मानणारा वर्ग नागवडे यांना मदत करणार असल्याचे चर्चा पेरली गेली, यात कसले ही तथ्य नसल्याचे सांगत नाहाटा व पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रक काढले. यामध्ये म्हटले आहे की, " विधानसभा निवडणुकीत काहीच ठरले नसताना हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने साक्ष काढणे हे नैतिकतेला धरून नाही. विधानसभा निवडणुकीत नागवडे हे सत्तेच्या मोहाने भाजप मध्ये आले होते. सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा काँग्रेस मध्ये गेले. विधानसभेला नागवडे यांना पाचपुते यांनी भाजप मध्ये स्वीकारले हा मनाचा मोठेपणा होता. सदाण्णा या सगळ्या प्रक्रियेचे एक भाग होते. आज राजकीय स्वार्थासाठी कोणीही असल्या वावड्या उठवू नयेत."
स्व. सदाशिव पाचपुते यांनी बबनराव पाचपुते यांचे नेतृत्व शिरसावंद्य मानून समाजकारण व राजकारण केले. बबनराव पाचपुते यांनी घेतलेल्या भूमिकेशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. बबनराव पाचपुते यांच्या प्रति असलेले अण्णांचे प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. बबनराव पाचपुते यांना दैवत मानत स्वामिनिष्ठा काय होती, हे उभ्या तालुक्याला माहिती आहे, त्यामुळे पाचपुते गटात कोणीही कुंभा कालवून राजकीय स्वार्थ साधण्याचे पाप करू नये, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब नाहाटा व सुनील पाचपुते यांनी व्यक्त केली.
चौकट
दोन गट,तीन गट असले आमच्याकडे चालत नाही.
पाचपुते यांचा दुसरा गट असे करणार, तसे करणार हे काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी केलेला उद्योग आहे. गेली चाळीस वर्षे आपली भूमीका तालुक्याला माहिती आहे. आमच्याकडे दोन- तीन गट असले काही चालत नाही. आमची वज्रमूठ कधीच सुटणार नाही. माझा भाऊ जाऊन वर्षे झाले नाही, अश्या परिस्थिती मध्ये आमच्यात बेबनाव असल्याची चर्चा करून राजकीय हित साधण्याचे पाप करू नये. नागवडे कारखान्या बाबत सर्व काही ४ जानेवारीला आपल्या समोर येईल - बबनराव पाचपुते. (आमदार, श्रीगोंदा विधानसभा)
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद