अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,Thu Dec 30 2021 20:13:19 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडे असणाऱ्या एका गावात काही दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंग सह बालकाचे लैगिंक अपराध सौरक्षण कायद्यनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस तात्काळ जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 चे दरम्यान पीडित मुलीची आई मोलमजुरी करण्यासाठी शेतात गेले असता पीडित घरात एकटीच असताना सायंकाळी 5 ते 6 चे दरम्यान एक 30 वर्षाचा अनोळखी इसम पीडित मुलीच्या घरासमोर मोटारसायकल वरती आला मोटारसायकलचा आवाज ऐकू आल्यावर पीडितेने थोडा दरवाजा उघडला आणि पाहिले असता सदर इसम त्यांच्याच घराकडे येत असल्याचे तिने पाहिले त्या इसमाने पीडित मुलीला विचारले की इकडे एक माझा मित्र राहतो तो कुठे राहतो त्यावेळी पीडितेने सांगितले मला माहित नाही असे म्हणत तीने दरवाजा बंद केला.
तरीही तो नराधम रोहिदास इधाटे (रा बेलवंडी बुद्रुक) हा फोनवर बोलत तिथेच उभा होता थोड्या वेळाने त्याने पुन्हा पीडित मुलीला आवाज दिला दीदी दरवाजा उघड संबंधित मुलीला वाटले की हा व्यक्ती आपल्या घरच्या लोकांशी बोलला आहे. त्यामुळे तिने अर्धा दरवाजा उघडला त्यावेळी नराधम रोहिदास इथाटे याने दरवाजा पूर्ण ताकतीने लोटून घरात प्रवेश केला व दरवाजा बंद केला आणि लैगिंक भावनेने छाती दाबू लागला त्यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता त्याने एका हाताने मुलीचे दोन्ही हात पकडले व दुसऱ्या हाताने तोंड दाबून दिवानवर ढकलले त्यावेळी पीडित मुलगी आरडाओरडा करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असताना तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली व ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात बोटे घातली मात्र मुलीने चावा घेतल्यामुळे हात काढला व आरडाओरडा करण्यास सुरुवात केली ही आरडाओरड ऐकून त्यांच्या शेजारी राहणारी मुलीची आत्या आवाज ऐकून पळत येऊ लागली.
तसेच पीडित मुलीचे चुलते ही पळत येऊ लागले हे नराधम रोहिदास इधाटे याने खिडकीतून पाहिले आणि खिडकीतून उडी मारून आपल्या मोटारसायकल वर पळून गेला त्यावेळी घरच्या मंडळींनी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यावेळी पीडितेच्या चुलत्यानी सदर इसम नराधम रोहिदास इधाटे हा असून तो कामानिमित्त ये जा करत असतो तो ज्या मोटारसायकल वर पळून गेला तिचा नंबर एम एच 12 एल एक्स 5832 असून होंडा कंपनीची शाईन गाडी आहे असे त्यांनी सांगितले. काही वेळाने पीडित मुलीचे आई वडील घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार तिने आई वडील याना सांगितला त्यानुसार आई वडील यांनी मुलीसोबत श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले व रोहिदास इधाटे यांच्यावर विनयभंग यासह बालकाचे लैगिंक अपराधापासून सौरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत असून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वाचक क्रमांक :