श्रीगोंदा सभागृहात नगराध्यक्ष सौ.पोटे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
By : Polticalface Team ,Thu Dec 30 2021 20:27:54 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा(प्रतिनिधी):- सुमारे ४३ लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत सजावट आणिअद्यावत फर्निचर अशा सभागृहाचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक २९ डिसेंबर रोजी नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई पोटे यांच्या हस्ते व उपनगराध्यक्षा सौ.मनीषा ताई लांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत होऊन लागलीच सभेचे कामकाज पार पडले.
पूर्वी मासिक बैठकी नगराध्यक्षांच्या दालनात होत असे परंतु अपुऱ्या जागेमुळे अनेक नगरसेवकांना कामकाज समजण्यात अडचण होत होती त्यावर उपाय म्हणून परिषदेच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात वैशिष्ट्य पूर्ण योजना२०१८-१९ मधून फर्निचर व अंतर्गत सजावट करण्यात आले.
प्रशस्त जागा ,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,मुख्याधिकारी, गटनेते यांची स्वतंत्र व्यवस्था सह समोर विषय समिती सभापती, नगरसेवक यांची तर बैठक व्यवस्था बेंच वर तर अधिकारी, विभागप्रमुख यांनाही बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.गटनेते मनोहर पोटे म्हणाले सभेत कामकाज करताना अनेक अडचणी येत विभागप्रमुख देत असलेली माहिती अथवा उत्तरे किंवा नगरसेवकांची मागणी यात व्यत्यय येत त्यामुळे परिषदेच्या सभागृहात फर्निचर व अंतर्गत बैठक व्यवस्था बेंच सह करण्याचे ठरविण्यात आले आता कामकाज चर्चेत अडचणी येणार नाहीत असे सांगितले तर सर्व नगरसेवकांनी देखील सभागृह सजावट फर्निचर कामाचे स्वागत केले.
प्रारंभी नगर परिषदेच्या आवारात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
वाचक क्रमांक :