दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार आरोग्य शिबीराचे आयोजन १९ सप्टेंबर २०२४ आरोग्यदूत आमदार अँड. राहुल कुल.
By : Polticalface Team ,17-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १७ सप्टेंबर २०२४ दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये दौंड शहर व ग्रामिण भागातील शेतकरी जेष्ठ पुरुष महिला. दिव्यांग नागरिकांना व युवा तरुण बालकांना मोफत उपचार महाआरोग्य शिबीर कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी श्री.बोरमलनाथ मंदिर. बोरीपार्धी (चौफुला) ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत. तंज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दौंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अँड राहुल कुल यांनी माहिती दिली.
ते पुढे बोलताना ते म्हणाले. पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा समावेश असुन तंज्ञ वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत
दौंड तालुक्यातील सर्व सामान्य पिढीत गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत या दृष्टीने
दौंड तालुक्याचे आमदार अँड.राहुल कुल यांच्या संकल्पनेतून या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये विविध वैद्यकीय तपासण्या करून. मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. दौंड शहर व ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अँड. राहुल कुल यांनी केले आहे.
या पूर्वी देखील २०१७ ते २०२० या कालावधीत सलग ४ वर्षा पासून दौंड तालुक्यातील विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. तालुक्यातील अनेक रुग्णांना फायदा झाला आहे. कोविड -१९ च्या कालावधीत आमदार अँड. राहुल कुल यांनी पुढाकार घेऊन सुमारे २०० व्हेंटीलेटर बेड व १०० बेडचा विलगीकरण कक्ष उभारुन ३०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर. चौफुला परिसरात सुरु केले होते. त्यामध्ये सुमारे ३५०० पेक्षा अधिक कोविड बाधित असलेल्या
गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.
दौंड तालुक्यासह राज्य भरातील अनेक रुग्णांना शासनच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत झाली आहे. प्रत्येकाच्या तपासणी पासून ते संपूर्ण उपचार सुविधा पर्यंत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.
गुरुवार दि १९ सप्टेंबर २०२४ रोजी श्री.बोरमलनाथ मंदिर. बोरीपार्धी (चौफुला) ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी
होणाऱ्या शिबिरामध्ये दौंड शहर व ग्रामिण भागातील शेतकरी जेष्ठ पुरुष महिला. दिव्यांग नागरिकांना व युवा तरुण बालकांना मोफत उपचार सुविधा देण्यात येणार आहे. दौंड तालुक्यातील सर्व पिढीत गरजूंनी रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन दौंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अँड. राहुल कुल यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :