श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,17-09-2024

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न

    लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील शिक्षक पालक मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे संचालक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर काकडे सर हे होते. 

     यावेळी प्रास्ताविकामध्ये ज्येष्ठ शिक्षक शिवाजी इथापे यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय परीक्षण बाबत ज्यादा तास; विविध स्पर्धा परीक्षा याबाबत मुख्याध्यापक; शिक्षक व शिक्षकेतर हे कर्मचारी सतर्क राहून विद्यालयाच्या गुणात्मक वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

      यावेळी विद्यार्थी पालक अजित दळवी यावेळी म्हणाले की; शाळेबद्दल अभिमान वाटतो शाळेची शिस्त; "स्वच्छ शाळा सुंदर शाळा" यासाठी झाडे लावून त्याचे संगोपन करावे असे सांगितले. 

     यावेळी पालक संतोष काकडे यांनी विचार मांडताना सांगितले की; संध्याकाळी विद्यार्थ्यांकडून लेखाजोखा घेतला जावा. शाळा व्यवस्थापनाचे काम समाधानकारक असल्याचे सांगितले. 

       अमोल साळवे यावेळी म्हणाले की; शाळेतील वातावरण समाधानकारक आहे. असे असताना सर्व जबाबदारी शिक्षकांवर लाधता येणार नाही; त्यासाठी पालकांनीही जबाबदारी स्वीकारावी असे सांगितले. 

      पालक इथापे संतोष यांनी सूचना मांडताना शाळेसमोर गतिरोधक करून घ्यावेत. तर विकास जठार यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी पी एस सी चा वापर झाला पाहिजे; अशी सूचना मांडली. अंबादास मडके यांनी विद्यार्थी अनुकरण करावे; राजवीर मडके यांनी ऊनमोतम नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा; पूर्णवेळ कॉम्प्युटर लॅब चालू करावी. अशा विविध विद्यार्थी व विद्यालयाच्या विकासासंदर्भात उपस्थित पालकांनी सूचना मांडल्या.

      यावेळी पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना प्राचार्य श्री पुराने ए. एल. यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे देत प्राचार्य पुराने म्हणाले की; पालक मेळावा हा पालकांच्या सूचनांसाठी असतो. यावेळी सूचनांचा आदर केला जातो. माझी सर्व सेवा गावच्या शाळेसाठी निस्वार्थपणे अर्पण केली आहे. शाळा प्रशासन चालवताना पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही; अशी ग्वाही देत प्राचार्य पुराने पुढे म्हणाले की; शाळेत उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित घेतला जातो. मुले हीच आपली खरी संपत्ती आहे; हा दूरदृष्टीकोन समोर ठेवला जातो. विद्यार्थी मोठा झाला म्हणजे शिक्षकांनाही आनंद होतो. ही भावना आम्हा सर्व शिक्षकांची आहे. पालकांनी देखील आपली जबाबदारी म्हणून पाल्यासंदर्भात वेळोवेळी विद्यालयात भेटी द्याव्यात;  पालक चांगले म्हणून विद्यार्थी चांगले शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी स्कूल कमिटीचे ही भरीव मार्गदर्शन लाभत असल्याचे श्री पुराने यांनी यावेळी सांगितले. 

      अध्यक्ष स्थानावरून बोलताना नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे यावेळी मार्गदर्शनपर भाषणात यांनी प्रथम गावचे उद्योजक लखन शेठ नगरे यांनी विद्यालयाला नवीन बेंचेस दिल्याबद्दल आभार व्यक्त करत; विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक काम करण्यास सक्षम आहेत. स्कूल कमिटीचे ही विद्यालय कडे बारीक लक्ष आहे. पालकांना शाळेबद्दल आदर आहे. परंतु वेळचे वेळी पाल्यांचा गुणात्मक बाबीसाठी शाळेत भेटी द्याव्यात; बंद अवस्थेतील प्रयोगशाळा चालू करून शिक्षकांकडून प्रयोग होण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.  विद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी लोकसभाग व माजी विद्यार्थी मेळावा घेण्याच्या सूचना देखील यावेळी श्री काकडे यांनी  शाळा प्रशासनाला दिल्या. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

    सूत्रसंचालन शिक्षक संभाजी इथापे यांनी केले स्वागत श्रीमती शेख नौशाद मॅडम यांनी केले आभार श्रीमती सायली गायकवाड मॅडम यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.