By : Polticalface Team ,Fri Dec 31 2021 14:35:56 GMT+0530 (India Standard Time)
रायमोहा (प्रतिनिधी) शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा ते नवगण राजुरी रस्त्याची पुर्णपणे चाळणी झाली आहे रस्त्यावर भल्ले मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामध्ये अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत यामुळे वाहनधारकाडून संताप व्यक्त केला जात आहे म्हणून हा रस्ता तात्काळ दुरूस्त कराव अशी मागणी शिरूर कासारचे तहसीलदार श्रीराम भेंडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब बीड, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अँड सर्जेराव तात्या तांदळे युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष तथा भाजप विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ सानप यांनी केली आहे लवकरात लवकर खोकरमोहा - नवगण राजुरी रस्ता दुरूस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे
वाचक क्रमांक :