खोट्याअट्रोसिटी गुन्ह्यामुळे मागासवर्गीय समाज बदनाम - दत्तात्रय शिंदे , खोटा गुन्हा असेल तर फिर्यादीवर ही कारवाई करू असे लेखी दिल्यामुळे उपोषण मागे

By : Polticalface Team ,Sat Jan 01 2022 17:22:18 GMT+0530 (India Standard Time)

 खोट्याअट्रोसिटी गुन्ह्यामुळे मागासवर्गीय समाज बदनाम - दत्तात्रय शिंदे ,  खोटा गुन्हा असेल तर फिर्यादीवर ही कारवाई करू असे लेखी दिल्यामुळे उपोषण मागे प्रतिनिधी /श्रीगोंदे :- श्रीगोंदे तालुक्यातील भावडी येथील मुक्ताबाई नामदेव शिंदे या महिलेने खोटा अट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे , या गुन्ह्याची सीसीटी फुटेज तपासानी करून सखोल चौकशी करावी व खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उपसरपंच यांच्या सह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे . श्रीगोंदे तालुक्यातील भावडी येथील दि २३ डिसबेर रोजी ग्रामपंचायत ची मासिक सभा संपल्यावर बाहेर येत असताना सरपंच धनश्री करनोर व उपसरपंच कमल छत्तीसे या गेटच्या बाहेर पडताच विरोधी गटाच्या महिलांनी सरपंच धनश्री करनोर यांना खाली पाडून मारहाण करत असताना सरपंच यांना वाचविण्यासाठी उपसरपंच कमल छत्तीसे या मध्ये पडल्या व मारहाण करू नका म्हणताच विरोधी गटाच्या महिलांनी व पुरुषांनी छत्तीसे यांनाही धक्काबुक्की करत जातिवाचक शिवीगाळ केली. याबाबत उपसरपंच छत्तीसे यांनी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दि. २३ रोजी गुन्हा दाखल केला. छत्तीसे यांनी गुन्हा दाखल करताच विरोधी गटाचे शहाजी रामचंद्र कोरडकर व ईतर काही व्यक्तिंनी मागासवर्गीय समाजातील मुक्ताबाई नामदेव शिंदे यांना पोलीस स्टेशनला बोलावून आत्माराम बन्सीलाल भोस, कल्याण कांतीलाल भोस, विठ्ठल रंगनाथ भोस, शहाजी दादासाहेब भोस, देवीदास आप्पासाहेब कोरडकर, यांचा काहीही संबंध नसताना राजकिय सुडापोटी अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला. मात्र खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर भावडी गावातील ग्रामस्थ संतप्त होऊन ग्रामस्थांनी आज दि. ३१ डिसेंबर रोजी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केले आहे. अट्रोसिटी गुन्हा खोटा दाखल केलेल्या मुक्ताबाई नामदेव शिंदे फिर्यादी मध्ये सांगतात की सकाळी ११.३० वाजता घटना घडली तर मग रात्री ११.४० वाजता म्हणजे तब्बल बारा तासांनी उशिरा गुन्हा का दाखल केला. या सदर घटना घडल्यापासून सीसीटीव्ही पूटेज पोलिसांनी तपासावे म्हणजे या प्रकरणातील सत्य बाहेर येईल . मात्र अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करणार्‍या मुक्ताबाई नामदेव शिंदे व त्यांना गुन्हा दाखल करण्यास भाग पडणार्‍या व्यक्तिंची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी ,शांतीलाल भोस , अँड सुनील भोस, लक्ष्मण कोरडकर, गुलाब शिंदे, दत्तात्रय शिंदे,सुनील सर्जेराव भोस, संजय करनोर, महेंद्र भोस, प्रभू कोरडकर, गोवर्धन भोसले, अशोक बाळू शिंदे, उत्तम लांडगे, सखाराम पांडूळे, हौसाबाई शिंदे व ईतर ग्रामस्थ यांनी श्रीगोंदे तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. चौकट :- भावडी येथील मुक्ताबाई नामदेव शिंदे या मागासवर्गीय महिलेने पिण्याच्या पाणी प्रश्नाबाबत अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला याच महिलेने सार्वजनीक पाणी पुरवठा विहिरीचे दुरुस्ती काम पूर्ण होऊ नये म्हणून मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी पंचायत समितीत दिलेल्या तक्रार अर्जामध्ये पहिली सही करून विरोध दर्शविला आहे. मग या महिलेने राजकिय सुडापोटी अट्रोसिटीचा गैरवापर केला आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाज बदनाम होत असल्याने अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे. चौकट :- या उपोषणा संदर्भात नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना फोन वरून माहिती दिली , त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सखोल चौकशी करू तसेच जर खोटा गुन्हा असेल तर फिर्यादीवर ही कारवाई करू असे लेखी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार व नायब तहसिलदार नेवसे तसेच सह्ययक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनक यांच्या उपस्थितत उपोषण सोडण्यात आले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.