श्रीगोंदा (प्रतिनिधी) :कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार महाराष्ट्रात पोहोचला आहे. गोरगरीब ,दुर्बल, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था काम करीत आहे. अनेक देणगीदारांनी सामाजिक बांधिलकी म्हणून देणगी दिली आहे. ग्वाल्हेरचे शिंदे घराणे यांचेही योगदान मोलाचे आहे. रयत शिक्षण संस्था ही काळाबरोबर बदलणारी संस्था आहे. आजचे युग हे डिजिटल युग आहे. या युगाप्रमाणेच शिक्षण द्यायला हवे. आधुनिकता शिक्षणात आणायला हवी. त्यातूनच ग्रामीण विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलतील. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे योगदान फार मोलाचे आहे. समाजाच्या कल्याणासाठी या महापुरुषांनी खूप मोलाचे काम केले आहे. स्त्री शिक्षणाबरोबर शेतकरी कल्याणाचा विचार महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी त्या कालखंडात मांडला होता. शेतकऱ्याचे दुधाचे उत्पादन उत्पादन वाढले पाहिजे .संकरित वाण तयार केले तरच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल व शेतकरी समृद्ध होईल असे विचार महात्मा फुले मांडत होते. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे राजे होते. आपल्या संस्थानाचा उपयोग त्यांनी दुर्बल घटकांना शिक्षण मिळावे, गोरगरीब, शेतकरी, दलित यांची प्रगती व्हावी यासाठी केला. शेतीमध्ये आधुनिकता यावी यासाठी त्यांनी धरणे बांधली. कर्मवीरांचा आदर्श महात्मा फुले व राजर्षी शाहू राजे होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा वारसा चालवला.पुढे मा. शरदरावजी पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते तर ते राष्ट्रपुरुष होते. त्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी कामे केली. भाक्रानांगल या धरणामुळे पंजाब हरियाणा या राज्यात 94% क्षेत्र बागायत झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या झोपडीत ज्ञानगंगा गेली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून गोरगरिबांचे जीवन फुलवले .हाच विचार आजही रयत शिक्षण संस्था करीत आहे. आधुनिकता स्वीकारून पुढे जात आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांनी मांडले. ते महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात बोलत होते. रयत शैक्षणिक संकुलाच्यावतीने आयोजित केलेल्या इमारत उद्घाटन व भूमिपूजन समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते ते म्हणाले की, भौतिक सुविधा वाढल्या तर गुणवत्ता वाढणारच. MHT -CET,नीट प्रवेश परीक्षेत घवघवीचे यश मिळवा. इंजिनिअर व्हा. डॉक्टर व्हा .इंटर ऍक्टिव्ह पॅनल प्रत्येक वर्गात बसले पाहिजेत. डिजिटल क्लासरूम झाले पाहिजेत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक व स्वागत रयत शिक्षण संस्था जनरल बॉडीचे सदस्य बाबासाहेब भोस यांनी केले. मोठ्या कष्टातून रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय उभे राहिले आहे. बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, प्रकाशशेठ पटवा, बाबुमिया बँडवाले त्यांच्या प्रयत्नातून हे महाविद्यालय आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज भागवीत आहे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते यांनीही विचार व्यक्त केले.म्हणाले की, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे काम रयतेचे शिक्षक करीत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. असे ते म्हणाले.
या समारंभासाठी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आ. राहुल जगताप, मीनाताई जगधने, राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे सचिव, माजी सनदी अधिकारी, विकास देशमुख, कुंडलिकराव दरेकर, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे,साजन पाचपुते, शिवाजीराव पाचपुते, महावीर पटवा बाजीराव कोरडे ,सुभाषशेठ गांधी, राजेंद्र खेडकर,नवनाथ बोडखे, गीता चौधरी दिलीप भुजबळ, मिलिंद दरेकर ,संतोष दरेकर, सुभाष रामराव कोरडे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा शहाजी मखरे, प्रा. शरद साळवे यांनी केले. आभार प्राचार्य डॉ.महादेव जरे यांनी मानले.