आध्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 233 वी जयंती दापोडी येथे उत्सहात साजरी. सागर चव्हाण ता.पुरंदर यांचे जोरदार व्याख्यान.
By : Polticalface Team ,29-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता २९ सप्टेंबर २०२४ दौंड तालुका जय मल्हार क्रांती संघटना शाखा दापोडी ता दौंड जिल्हा पुणे. यांच्या संयुक्त विध्यमानाने आध्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष मा.दौलतनाना शितोळे,दौंड तालुक्याचे माजी आमदार मा.रमेश आप्पा थोरात ,दौंड तालुक्याचे जेष्ठ नेते महेश आण्णा भागवत. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते मा.विष्णुआप्पा चव्हाण जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा.बापूसाहेब खोमणे. प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी बहुजन महापुरुष आणि महामातांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते. पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. आध्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३३ वी जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.सागरजी चव्हाण सर ता.पुरंदर यांचे जोरदार व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.या वेळी मान्यवरांनी राजे उमाजी नाईकांच्या कार्याचा गुणगौरव करून वर्तमान पिडीने प्रेरणा घेण्याचे आपल्या भाषणात आवाहन केले. जय मल्हार क्रांती संघटना दापोडी शाख्येचे पधादिकारी आणि विग्नहर्ता प्रतिष्ठान दापोडी यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात जयंतीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी तर आभार दापोडी शाख्येचे अध्यक्ष विशाल जाधव यांनी मानले.या प्रसंगी दापोडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :