By : Polticalface Team ,30-09-2024
कर्जत प्रतिनिधी राष्ट्रीय जनता दलाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हिना शेख यांनी निवड करण्यात आली हिना शेख नेहमीच राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असतात याचीच दखल घेत राष्ट्रीय जनता दलाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी दिली या मध्ये प्रामुख्याने महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मीनाताई मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कर्जत तालुका अध्यक्ष पदी अनिता कापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अनिता कापसे या कर्जत तालुक्यात महिला बचतगटांच्या माध्यमातून व होमलोन च्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात परिचीत आहेत त्यांना समाज सेवेची तळमळ असलेल्या महिला म्हणून ओळखले जाते त्यांच्या याचं कार्याची दखल घेऊन पक्षाने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे सौ कापसे यांची संपुर्ण कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच आघाडी असते त्यांच्या बरोबर सौ संचिता सुर्यवंशी यांची जिल्हा सचिव पदी तर मदिना शेख यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर युवकांमध्ये बापुराव जाधव यांची जिल्हा सचिव पदी तर कर्जत तालुका अध्यक्ष पदी प्रशांत भगत यांची वर्णी लागली आहे सर्वच नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी मजबूत संघटन करून सामान्य जनतेची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला या वेळी राष्ट्रीय जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष गंगाराम मचे प्रदेश महासचिव मा.रफिक इनामदार तसेच ज्ञानदेव काळे सचिव सुभाष ढवळे, सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी खोरे साहेब ,आण्णा तनपुरे ,शंकर भगत ,विष्णू पवार ,विकास पवार, मिरदास सुळ ,मोहन नामदेव सुपेकर ,दादासाहेब होगले ,दत्तात्रय निकम, परशुराम शिर्के, तसेच जेष्ठ मार्गदर्शक नवनाथ आबा तनपुरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते
वाचक क्रमांक :